शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘इबोला’च्या उपायांबाबत अबोला

By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST

अहमदनगर : ‘इबोला’या विषाणूजन्य आजाराची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आहे.

अहमदनगर : ‘इबोला’या विषाणूजन्य आजाराची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आहे. त्यामुळे हा आजार कोठून येणार, कुठे पसरणार याची विचारणा लोकांमधून सुरू झाली आहे. याबाबत खबरदारी घेण्याबाबत मात्र जिल्हा प्रशासनाने उदासीनता दाखविली आहे. इबोलाच्या संशयितांसाठी कोणताही कक्ष अद्याप स्थापन करण्यात आला नसून राज्य शासनाने तसे कोणतेही आदेश दिले नाहीत, असे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. इबोला नगरमध्ये येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असाही दावा रुग्णालयाने केला आहे.सुदानमधील इबोला नदीच्या काठावर वसलेल्या काँगो येथे ही साथ पहिल्यांदा आढळून आली. इबोला हा साथीचा रोग मध्य व पश्चिम अफ्रिकेतील दुर्गम खेड्यांमध्ये पसरला आहे. हा रोग मुख्यत्त्वे प्राण्यांना होतो, अपघाताने माणसांमध्ये या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या रोगाविषयी सोशल मीडियावरून जोरदार प्रसार झाला असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. चिकुनगुणिया, स्वाईन फ्ल्यू या आजारासारखीच या इबोला या साथीच्या रोगाची लक्षणे असल्याने नागरिकांमध्ये थोडी-फार भीती निर्माण झाली आहे. या रोगाची लक्षणे आढळून आली तर रूग्ण प्रथमत: रुग्ण जिल्हा रुग्णालयात धाव घेतो. मात्र जिल्हा रुग्णालयात उपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच इबोला या साथीच्या आजाराविषयी प्रबोधन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार याबाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली दिसली नाही. या आजाराच्या संशयितांना तपासणी करण्यासाठी कोणताही कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही.(प्रतिनिधी)