१९ वर्षीय मुलीवर अत्याचार , अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:19 IST2024-12-10T16:18:23+5:302024-12-10T16:19:53+5:30
आरोपीने पीडितेशी जवळीक साधत जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केले. त्याने मोबाइलमध्ये तिचे अश्लील फोटोही काढले.

१९ वर्षीय मुलीवर अत्याचार , अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Ahilyanagar Crime ( Marathi News ) : एका १९ वर्षीय मुलीवर अत्याचार करत अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०२२ ते २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी विजय दिलीप पोकळे (वय २२, रा. अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पीडितेची २०२२ मध्ये आरोपीशी फोनवरून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघे एकमेकांना भेटत होते. आरोपीने पीडितेशी जवळीक साधत जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केले. त्याने मोबाइलमध्ये तिचे अश्लील फोटोही काढले. अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने पीडितेला धमकी दिली. नातेवाइकांच्या मोबाइलवर त्याने पीडितेचे काही फोटो टाकले. नातेवाइकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचे फोटो पाठविणे सुरू होते. त्यामुळे पीडितेने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ तसेच इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत करत आहेत.