शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी ७८० कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, ...

कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर, कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा या ग्रामपंचायतींसाठी उद्या ( शुक्रवारी दि.१५) मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पार पडणार आहे. यासाठी २९ ग्रामपंचायतींच्या २७९ जागांपैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २७२ जागांसाठी ६११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत ३२ हजार ८९६ पुरुष व ३० हजार ८८९ स्त्री असे एकूण ६३ हजार ७८५ मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण १११ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये ११२ मतदान यंत्रे तर १११ नियंत्रण यंत्रे आहेत. तसेच अधिकची १४ मतदान यंत्रे व नियंत्रण यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रक्रिया हाताळण्यासाठी १३० मतदान केंद्राध्यक्ष, ३९० मतदान अधिकारी व १३० शिपाई असणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षेसाठी एकूण १३० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. असे एकूण ७८० कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावणार आहेत. तसेच महामंडळाच्या एकूण २१ बस व ६ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.

............

२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पाडण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात सर्व अधिकारी, कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रकियेत खबरदारी घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- योगेश चंद्रे, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कोपरगाव

..........

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रांवर पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कर्मचारी प्रत्येक मतदाराचे तापमान तपासणार आहे. जर एखाद्या मतदाराला तापमान आढळले तर त्यास टोकन देऊन त्याचे सायंकाळी मतदान करून घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत मतदारांनी देखील अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करावे.

- संतोष विधाते, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव