शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

अहमदनगर: स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणाऱ्या ७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड आढळून आली.

अहमदनगर: स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणाऱ्या ७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड आढळून आली. या व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. विवरणपत्रातील तफावत व गत आर्थिक वर्षात कर भरणा न झाल्याचे या सुनावणीत समोर आल्याचे सांगण्यात आले. अजय चारठाणकर हे औरंगाबादला असताना तेथील एलबीटी वसुलीत मोठी वाढ झाली होती. आता ते नगरला उपायुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी एलबीटी उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जकात त्यानंतर पारगमन शुल्क वसुली बंद झाल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. उत्पन्न वाढीसाठी एलबीटीशिवाय पर्याय नाही. गत महिन्यात चारठाणकर यांनी एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या फाईल्स तपासल्या होत्या. त्याचवेळी त्यात गडबड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांची सुनावणी ठेवण्यात आली. बुधवारी ७३ पैकी ६५ व्यापाऱ्यांच्या फाईल्सची तपासणी करण्यात आली. २०१२-१३ वर्षात काहींनी एलबीटी भरला नसल्याचे निदर्शनास आले. या आर्थिक वर्षात कर न भरण्याची कारणे चारठाणकर यांनी जाणून घेतली. काही व्यापाऱ्यांनी २०१३-१४ वर्षात कर भरला. त्यामुळे गत आर्थिक वर्षात एलबीटीचे उत्पन्न कमी दिसले. आयकर विवरण पत्र व एलबीटी भरताना महापालिकेला सादर केलेले विवरणपत्र यात तफावत असल्याचे सुनावणीत दिसून आले. व्यापाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. आता उपायुक्त चारठाणकर हे कायदेशीर निर्णय घेणार आहेत. यामुळे उत्पन्न वाढीस हातभार लागणार आहे.(प्रतिनिधी)