नगर जिल्ह्यात आज ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह; ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:41 IST2020-07-22T13:40:39+5:302020-07-22T13:41:26+5:30
जिल्ह्यात मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे.

नगर जिल्ह्यात आज ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह; ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे.
दरम्यान, बुधवारी ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये आढळून आलेल्या ७० बाधित रुग्णामध्ये, संगमनेर तालुका २४, पारनेर तालुका १, श्रीगोंदा तालुका ५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ३, राहुरी १ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.