शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगर मॅरेथॉनमध्ये धावणार ५ हजार स्पर्धक

By admin | Updated: December 17, 2015 23:38 IST

अहमदनगर : पुणे, मुंबई येथे होणाऱ्या मॅरेथॉनच्या धर्तीवर नगर शहरात नगर रायझिंग फौंडेशन व शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्यावतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़

अहमदनगर : पुणे, मुंबई येथे होणाऱ्या मॅरेथॉनच्या धर्तीवर नगर शहरात नगर रायझिंग फौंडेशन व शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्यावतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़ ही स्पर्धा ७ फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली़ महाराष्ट्र अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन व जिल्हा अमॅच्युअर असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत असून, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे़ या स्पर्धेसाठी ३, ५, १० व २१ किलोमीटर अंतराचे गट तयार करण्यात आले आहे़ तसेच या वर्षी ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा गट असणार आहे़ ३ ते ५ किलोमीटर अंतराची स्पर्धा ही लोकांमध्ये पळण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेण्यात येणार आहे़ १० आणि २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत स्त्री व पुरुषांचे स्वतंत्र गट तयार करण्यात येणार असून, या दोन्ही गटातील स्त्री व पुरुष विजेत्यांना प्रत्येकी ३० हजार, २० हजार व १० हजार रुपयांच्या रोख बक्षिसांसह मेडल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे़ या स्पर्धेत ३-५ हजार स्पर्धक सहभागी होतील़ स्पर्धेचा मार्ग भुईकोट किल्ला ते चांदबिबी महाल असा असणार आहे़ अनुरोन इन्फ्रास्ट्रक्चर, नमोह इंडस्ट्रीज, तारडे हॉस्पिटल, डॉ़ सोनवणे कॅन्सर क्लिनीक येथे स्पर्धेची नाव नोंदणी करण्यात येत आहे़ तसेच नगर रायझिंग या संकेतस्थळावरही नाव नोंदणी सुरु असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले़ यावेळी नगर रायझिंग फौंडेशनचे सदस्य डॉ़ शाम तारडे, डॉ़ सतीश सोनवणे, अ‍ॅड़ गौरव मिरीकर, संयोजक संदीप जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)