शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात

By admin | Updated: June 6, 2014 13:44 IST

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे.

अहमदनगर : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे़ वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे विद्युत रोहित्रे नादुरुस्त होऊन वीज पुरवठा विस्कळीत झाला असून, मध्यवर्ती शहरासह जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़शहरासह जिल्ह्यात सध्या तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे़ त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो़ त्यात आता वादळी वार्‍यासह होणार्‍या पावसाचीही भर पडली आहे़ पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले असून, शहरासह जिल्हा अक्षरश: अंधारात चाचपडतो आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित केला होता, हे विशेष़ दुरुस्तीचे काम होऊनही महावितरणची दाणादाण उडालीच़ वादळाने विद्युत खांब कोसळले़ काही ठिकाणी तारा तुटल्या़ त्यामुळे भर पावसात वीज गायब झाली़ त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली़ मध्यवर्ती शहरातील विद्युतभवनमधील रोहित्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास नादुरुस्त झाले़ मुळा धरणाकडे जाणारी वीज खंडित झाली़ वसंत टेकडीचे रोहित्रही बंद पडले़ परिणामी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला़ वसंत टेकडी येथील रोहित्र सुरू करण्यात कर्मचार्‍यांना पहाटे चार वाजता यश आले़ त्यामुळे काही भागाला पाणी देणे शक्य झाले़ सावेडी उपनगरातील रोहित्र रात्री ८़ ३० वाजता नादुरुस्त झाले़ त्यामुळे शेंडी गाव रात्रभर अंधारात होते़ जिल्ह्यात तर यापेक्षाही भयावह स्थिती असून, जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात भारनियमन सुरू आहे़ त्यात आता तातडीच्या भारनियमाची भर पडली़ त्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतानाच वादळी वार्‍याने वाड्या -वस्त्यांवरील वीज अचानक गायब झाली़ काल बुधवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील एक हजार १०० विद्युत खांब कोसळले़ तारा तुटल्या असून, वीजपुरवठा खंडित झाला़ विद्युतपुरवठा खंडित झालेल्या गावांची माहिती घेऊन दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ बहुतांश रोहित्र विजेच्या कडकडाटाने नादुरुस्त झाले आहेत़ आकाशातून पडणार्‍या विजेचा दाब प्रचंड असल्याने रोहित्र नादुरुस्त होतात़ ते दुरुस्त करणे शक्य आहे़ परंतु खांब उभे करून तारा जोडणे, ही कामे करणे कठीण आहे़ परिणामी ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागतील,असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे़