मांडवे येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयाचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:04+5:302021-07-20T04:16:04+5:30

विद्यालयातून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्रावीण्यमध्ये १३, प्रथम श्रेणीमध्ये १५ व द्वितीय श्रेणीमध्ये ६ ...

100% result of Kakasaheb Mhaske Vidyalaya at Mandve | मांडवे येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयाचा निकाल १०० टक्के

मांडवे येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयाचा निकाल १०० टक्के

विद्यालयातून एकूण ३४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्रावीण्यमध्ये १३, प्रथम श्रेणीमध्ये १५ व द्वितीय श्रेणीमध्ये ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक वेदांती अशोक निमसे (९२ टक्के), द्वितीय क्रमांक आदिती पोपटराव निमसे (८८.८०), तृतीय क्रमांक साक्षी संजय निमसे (८७.६०) यांनी मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तात्रय गुंड, कल्याण ठोंबरे, बबन खांदवे, पंढरीनाथ निमसे, धनराज शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निक्रड, सचिव व गावचे सरपंच सुभाष निमसे, उपसरपंच संजय निमसे, डॉ. प्रशांत निक्रड, माजी सरपंच संजय निमसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब निमसे, सेवा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग निमसे, उद्योजक बबन निमसे, पत्रकार ज्ञानेश्वर निमसे, भाऊसाहेब होळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपटराव निमसे, रमेश पिंपळे, माजी सरपंच अजय बोरूडे, उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशव निमसे, संतोष निमसे, महेंद्र निक्रड, सदाशिव भालेकर, तुकाराम बोरूडे, गोवर्धन अनर्थ व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Web Title: 100% result of Kakasaheb Mhaske Vidyalaya at Mandve