Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 12 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 10:42 IST2019-12-12T10:42:19+5:302019-12-12T10:42:54+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 12 डिसेंबर 2019
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 12 डिसेंबर 2019
भारतीय सौर 21, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा 10 क. 42 मि.
रोहिणी नक्षत्र 06 क. 22 मि., वृषभ चंद्र 18 क. 23 मि.
सूर्योदय 7 क. 03 मि. सूर्यास्त 06 क. 01 मि.
दिनविशेष
1930 - क्रांतिकारक बाबू गेनू यांचे निधन
1940 -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म
1949 - अभिनेता रजनिकांत तथा शिवाजी गायकवाड यांचा जन्म
1964 - राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचे निधन
1981 -क्रिकेटपटू युवराज सिंग याचा जन्म
1992 - भारतीय संस्कृतिकोशाचे संपादक पं. माधवशास्त्री जोशी यांचे निधन
2005 - 'रामायण' मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे निधन
आज जन्मलेली मुलं
वृषभ राशीत जन्मलेल्या मुलांचा प्रांत 18 क. 23 मि. पर्यंत राहील. त्यानंतर मुले मिथुन राशीत जन्मास येतील. परिश्रम आणि विचार कार्यपथावरील प्रवासाचे प्रमुख आधार राहतील. कल्पकतेने त्यात आकर्षण निर्माण करता येईल. माता-पित्यास शुभ. वृषभ राशी ब, व, ऊ, अद्याक्षर, मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी