todays panchang importance day marathi panchang 22 august 2019  | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 22 ऑगस्ट 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आजची मुले मेष राशीत जन्म घेतील. चंद्र-नेपच्यून शुभयोगामुळे कार्यप्रांतात स्वत: ची कार्यकेंद्रे उभी करू शकतील. शिक्षण, परिवार, व्यवहार ही त्यांची प्रमुख वर्तुळं राहतील. प्रतिष्ठितांशी संपर्क राहतील. माता-पित्यांना शुभ. 

मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

गुरुवार, दि. 22 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 31 श्रावण 1941

मिती श्रावण वद्य षष्ठी 7 क. 6 मि. 

भरणी नक्षत्र 26 क. 36 मि. मेष चंद्र 

सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 07 क. 00 मि. 

दिनविशेष 

1907 - भारतीय राष्ट्रध्वजाची रचना तयार करून मादाम कामा यांनी तो प्रदर्शित केला. 

1924 - हिंदी साहित्यातील हरिशंकर परसाई यांचा जन्म. 

1980 - अभिनेता व दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन.

1982 - कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारक भारणारे एकनाथ रानडे यांचे निधन.

1989 - प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. 

1999 - चित्रपट अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन. 

2014 - कवी, नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 22 august 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.