Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 16 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 08:36 IST2020-01-16T08:35:47+5:302020-01-16T08:36:19+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 16 जानेवारी 2020
कन्या राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-मंगळ शुभयोगामुळे कर्तृत्वसंपन्न असतील. अनेक कार्यप्रांतात प्रभाव निर्माण करतील. विद्या ते व्यावहारिक विकास त्यांचा मार्ग राहील. माता-पित्यास शुभ.
कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 16 जानेवारी 2020
भारतीय सौर 26 पौष 1941
मिती पौष वद्य षष्ठी 09 क. 45 मि.
हस्त नक्षत्र, 26 क. 31 मि., कन्या चंद्र
सूर्योदय 07 क. 13 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.
करी दिन
दिनविशेष
1901 - समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
1920 - कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांचा जन्म.
1926 - संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा जन्म.
1938 - बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी यांचे निधन.
1946 - अभिनेता कबीर बेदी यांचा जन्म.
1954 - चित्रपट निर्माते. चित्रकार, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन.
1988 - अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झा यांचे निधन.
2005 - संगीतकार श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.