Surya Grahan 2021: सूर्य ग्रहण फायद्याचे ठरणार?; उत्तर प्रदेशमध्ये मोठी उलथापालथ, इंधन दर कमी होण्याचे 'भाकित'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:03 PM2021-11-25T18:03:24+5:302021-11-25T18:24:31+5:30

Surya Grahan 2021 benefits said by Astrologer: यंदाचे होणारे हे शेवटचे सूर्यग्रहण खूप खास आहे. 4 डिसेंबरच्या सूर्यग्रहणानंतर, हिवाळ्यातील वेगवान हवामान बदलांसह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भारतात ते दिसणार नाही.

Surya Grahan 2021: Solar eclipse will be beneficial; Petrol, diesel prices to be reduced | Surya Grahan 2021: सूर्य ग्रहण फायद्याचे ठरणार?; उत्तर प्रदेशमध्ये मोठी उलथापालथ, इंधन दर कमी होण्याचे 'भाकित'

Surya Grahan 2021: सूर्य ग्रहण फायद्याचे ठरणार?; उत्तर प्रदेशमध्ये मोठी उलथापालथ, इंधन दर कमी होण्याचे 'भाकित'

googlenewsNext

2021 मधील शेवटचे सूर्य ग्रहण येत्या 4 डिसेंबरला होणार आहे. हे ग्रहण अत्यंत महत्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून डिसेंबर महिन्यात सूर्य ग्रहण लागत आहे. हा हॅट्रिकचा योगायोग असला तरी त्याचे नागरिकांच्या आयुष्यावर चांगले परिणाम जाणवणार आहेत. 

यावेळच्या सूर्य ग्रहणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रहण धनु राशीत नाही तर वृश्चिक राशीत होत आहे. आधीची दोन ग्रहणे ही धनु राशीत झाली आहेत. आणखी एक खास योगायोग म्हणजे हे ग्रहण शनिवारी लागणार आहे, तेव्हा शनी अमावास्या देखील असणार आहे. तिसरी बाब म्हणजे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळ ग्रह आपलेच स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून, या राशीत आताच्या घडीला सूर्य विराजमान आहे. यामुळे या ग्रहणाचा प्रभाव कसा असेल याची माहिती प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ सचिन मल्होत्रा यांनी सांगितली आहे. 

मेदिनी ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळी तयार होणाऱ्या कुंडलीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे सांगण्यात आले आहे की ग्रहणाचा प्रभाव ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणी जास्त असतो, परंतु संक्रमणामध्ये विशेष ग्रहस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रहणाचा प्रभाव जवळपास सर्वत्र दिसून येतो. अगदी अलीकडे, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी झालेले आंशिक चंद्रग्रहण भारतातील ईशान्येकडील काही भागातच दृश्यमान होते, परंतु त्याच दिवशी 'कृषी कायदे' रद्द करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेने फरक पडला. देशाच्या राजकारणात मोठा फरक पडला. एनबीटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

या सूर्य ग्रहणामुळे काय होणार...
आता 4 डिसेंबरच्या सूर्यग्रहणानंतर, हिवाळ्यातील वेगवान हवामान बदलांसह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात देखील मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी ग्रहणाच्या वेळी अमावस्येच्या कुंडलीतील नवव्या भागात सूर्य, चंद्र, बुध आणि केतू यांची स्थिती पाहता केंद्र सरकार काही कल्याणकारी पावले उचलण्याचे संकेत आहेत. जनतेच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई कमी होईल. 7 डिसेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचा लाभही जनतेला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयही काही मोठे निर्णय घेऊन जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. 

हे सूर्य ग्रहण पूर्णपणे ऑस्र्ट्रेलियात दिसणार आहे. यामुळे तिथे एका मोठ्या समुद्री वादळाची आणि पावसाची शक्यता आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी भागात मोठी हाणी होण्याची शक्यता वर्तविली आहे. ग्रहणाच्या 45 दिवसांत ऑस्ट्रेलियात काही मोठी वादळे आणि भारतात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Surya Grahan 2021: Solar eclipse will be beneficial; Petrol, diesel prices to be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.