शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

संस्कारांची शिदोरी भारी.. यशाची उत्तुंग भरारी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 9:03 PM

जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं

मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहचला त्यांची आज पहिली मुलाखत होती. तो घराबाहेर निघताना विचार करीत होता व त्याची इच्छा होती. जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या गावाला सोडून येथे शहरात स्थायिक होईल. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासुन मुक्तता मिळेल.सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा. मग बाथरूममध्ये जा,बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का ?टाँवेल जागेवर ठेवला की दिला फेकुन? नाश्ता करून घराबाहेर निघालो कि लगेच वडिलांचा आवाज"पंखा बंद केला की चालुच आहे ?"काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील......

आँफिसच्या  दरवाज्याजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते ,ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वाँटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,समोर बोर्ड वर लीहलेले होते तुमचा इंटरव्यू वरच्या मजल्यावर आहे....

जिन्यातील लाइट चालुच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहिले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बाँसच्या कँबिनमध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते....तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले की , बॉस फाइल पाहुन काहीच प्रश्न विचारत नाहीत आणि परत पाठवुन देत आहेत . असे समजले. माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले. मी दरवाजा वाजवून विचारले , आत येऊ का सर ? " एस कम इन " आतुन आवाज आला . बसण्यासाठी सुचना मिळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली.....

फाईल मधील माझ्या कागदपत्रावर नजर मारत असताना कोणताही प्रश्न न विचारता बॉसने विचारले  "केव्हा ज्वाइन करत आहात ?"बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो. मला वाटले ते माझी गंमत करत आहेत. माझा चेहरा पाहून ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .आजच्या मुलाखतीतून कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही. फक्त सीसीटीव्हीमध्ये मुलाखतीमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचालीमध्ये सर्व काही पाहिले. मुलाखतीसाठी बरेच जण आले,वाँटर कुलरचे गळणारे पाणीसर्वानी पाहिले पण त्याकडे दुर्लक्ष केले. व्हतुम्ही ते बंद केले तसेच व्हरंड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही तो लाईट तुम्ही बंद केला.मध्येच ररस्त्यात पडलेली खुर्ची  तुम्ही उचलली.धन्य तुमच्या पालकांना , ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले.

कितीही हूशार असला ,चतुर असला पण संस्कारात कमी असाल तर ती व्यक्ती मैनेजमेंट आणि जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही.घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मिळाली. आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान बाबीवर बोलणारे ,नेहमी सुचना देणाऱ्या आई वडीलाकडुन मला जी शिस्त मिळाली. ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रिय संस्कारापुढे मी मिळवलेली पदवीची काहीच हैसियत नाही.जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...

जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं आहे. आयुष्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी शिस्त अंगात बाणा. शिस्तीनेच समृद्धी मिळेल.या संस्कारासाठी आई वडिलांच व शिक्षकांच फार मोठ योगदान असेल तरच भावी पिढी सुखी व आनंदी  होईल .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक