शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मन :शांती : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 1:23 PM

ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पुर्वताप किंवा पश्चाताप न करता चुक झाली की, समोरच्या माणसाची माफी मागुन ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा.

-डॉ. दत्ता कोहिनकर- निता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती. अलिकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले. मी, निताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले. बोलता बोलता अजितच्या डोळयात अश्रू तरळले व म्हणाला सर २ महिन्यांपूर्वी आईची आणि माझी निताच्या वागण्यावरून निता घरी नसताना भांडणे झाली. भांडणामध्ये आई ने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपांमुळे माझा राग भडकला व मी, रागाच्या भरात आईवर हात उगारला व धक्का बुक्की केली.आईसारखे जगात दुसरे दैवत नाही असे बऱ्याचदा वाचले होते त्यामुळे शांत झाल्यावर मला माझी चूक समजून आली व पश्चातापाने माझ्या मनाला घेरले. तेव्हा पासून मला रात्री झोप येत नाही व नैराश्य आलं आहे. ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही. अजित रडून शांत झाल्यानंतर मी त्याला म्हणालो, अजित कह्योध आवरता न आल्यामुळे तुझ्याकडून हे कृत्य घडलं आहे. मी देखील कह्योधाच्या भरात आईला अपशब्द वापरले होते. शांत झाल्यानंतर मात्र मी तिची पाय धरून माफी मागितली होती. ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पुर्वताप किंवा पश्चाताप न करता चुक झाली की, समोरच्या माणसाची माफी मागुन ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा. मनुष्य विकारांच्या अधीन झाला कि त्याच्याकडून चुका होऊ शकतात. सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धात लाखो लोक मारली. या कृत्याचा त्याने पश्चाताप केला असता तर त्याला नैराश्याने घेरले असते व तेथेच अशोकाची कारकीर्द संपून पुढील इतिहास घडलाच नसता. सम्राट अशोकाने प्रज्ञापूर्वक विचार करून बुद्धांच्या मागार्ने जायचे ठरवले. चंड अशोक मनातील विचार बदलून धर्म अशोक झाला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हवाई दलात भरती होऊ शकले नाहीत, कारण निवड समितीने पहिल्या 8 विद्यार्थ्यांची निवड केली अब्दुल कलामांचा नंबर नववा होता. परंतु ते अपयश त्यांना भारत देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी निती ने दिले होते. चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन निवेदकाच्या परीक्षेत नापास झाले. जो आवाज त्यावेळी निवेदक बनण्याच्या लायकीचा मानला गेला नाही तोच आवाज चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ ठरला. त्यामुळे अपयश आले तरी नकारात्मक विचार न करता, खचुन न जाता, सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांनी युक्त असे मन जीवनात दु:ख आणते. हाच विचार सकारात्मक केला असता दु:ख मुक्तीच्या रस्त्यावर आपली वाटचाल सुरू होते. गरम तव्यावर पाणी पडले तर चर-चर करून त्याची वाफ होते व हवेत उडून जाते. मात्र हिरव्या पाण्यावर पडलेले थेंब मोत्याचे रूप घेऊन डोलू लागतात. नकारात्मक विचारांनीयुक्त दु:खी मन हे गरम तव्यासारखे असते. तर सकारात्मक विचारयुक्त समाधानी मन कमळाच्या हिरव्या पाण्यासारखं असते. म्हणुन आपण आपल्या मनाला कसे घडवायचे हे आपल्या विचारांवर अवलंबुन असते. नदीच्या किनाऱ्यावरील झाडावर एक माकड त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत बसले होते. अचानक आकाशवाणी झाली ..जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशवाणी संपताच माकडीण पाण्यात उडी मारते व राजकुमारी बनून बाहेर येते. माकड तिला म्हणतो वेडे आकाशवाणी खोटी ठरली असती तर, त्यावेळेस माकडीण म्हणते अरे जरी आकाशवाणी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येताना माकडीनच राहिले असते. पण मी त्वरित सकारात्मक विचार करून संधीचा लाभ घेतल्याने आता मी राजकुमारी झाली आहे, तू मात्र माकडच राहिलास. आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीचं असते. या आकाशवाणीला सकारात्मक विचारांची जोड देऊन आनंदाने जीवन जगा..  आपल्या  जीवनाची उर्ध्वगती किंवा अधोगती  ताकद ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. म्हणुन नेहमी सकारात्मक विचार करा, सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा, तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बोधवचन आपल्या जीवनात खरोखर उतरवण्यासाठी सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतींची जोड महत्वाची आहे. 

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाAdhyatmikआध्यात्मिक