शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

आनंद तरंग: शक्तीचं स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:24 AM

श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही.

बा.भो. शास्त्री

शौर्याशिवाय धैर्य व धैर्याशिवाय शौर्य अपंग आहे. शौर्य जवळ असून अर्जुनासारखा वीर धनुर्धर रडत होता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीतेत मंत्र दिला.‘‘देहिनोस्न्यथा देहेकौमार योवनं जरातथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति’’हा श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही. आपला नेमका धीरच खचलेला असतो. आपण घाई करतो, दम निघत नाही. गाड्यांचे अपघात हे धीर नसल्याने होतात, ओव्हरटेक करताना होतात. आपण दमच धरत नाही. घरात घरातली भांडणं, समाजातल्या समस्या अधीर मनामुळे होतात. चहात साखर कमी-जास्त झाली की भांडणाचं कारण कलहाला पुरेसं होतं. मन स्फोटक झालं आहे. काही लोक अभिमानाने म्हणतात, ‘‘मेरी गाली और गोली साथ साथ चलती है.’’ का रे बाबा, जरा धीर धर ना! त्याच्यात किंवा तुझ्यात बदल होण्याची वाट पाहा. धीर धरून संवाद कर, चर्चा कर, समस्या मिटेल. शिष्टाई नेहमीच फसत नसते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची माती करायला निघालेल्या रामेश्वरभटाचा संत तुकाराम महाराजांनी धैर्याने विरोध सहन केला. शेवटी त्यांच्यावर आरती त्यानेच लिहिली. कसोटीला उतरण्यासाठी देवाच्या मूर्तीला व दवाखान्यातल्या पेशंटलाही धीर धरावाच लागतो. स्वामींनी आचार्यांना गीतेचं पारायण सांगितलं नाही, नवस करायला सांगितलं नाही, वैद्याकडे नेलं नाही तर हृदयातच झोपलेल्या धीरत्व व वीरत्वाला जागं केलं. अंधश्रद्धेला त्यांनी कधीच खतपाणी घातलं नाही. ते माणसातील सुप्त गुणांना जागवत राहिले. आपल्याच विसरलेल्या शक्तीचं स्वामी स्मरण करून देत होते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक