शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मित्रांनो, वेळीच व्यक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:25 AM

कारण.. आसक्ती दुःखाचे कारण आहे.

- डॉ. दत्ता कोहिनकर

मित्रांनो, वॉशिंग मशिनमधून धुऊन झालेले कपडे बाहेरच न काढता मशीनमध्येच ठेवले तर त्याला घाण वास येऊन ती दुर्गधी तुम्हाला असह्य करेल . आपल्याला कोणीतरी प्रचंड दुखावल ; बैचेनी, अस्वस्थता, व्याकुळता, द्वेष, क्रोध, अपराधीपणाची भावना , प्रेम, अशा अनेक भावनिक विचारांनी मनात अस्वस्थता आली , घालमेल सुरू झाली . त्या विचारांचे मजल्यावर मजले तुम्ही मनातच व्यक्त करीत राहिला , ते विचार तुम्ही व्यक्त केले नाही , बाहेर काढले नाही . भावनांचे कल्लोळ मनातच दाबून ठेवले तर त्या दमन केलेल्या भावना आपल्याला बेचैनी व नैराश्याकडे नेतील व हे दमन आज ना उद्या अक्राळविक्राळ रूप धारण करून नको त्या गोष्टी घडतील . म्हणून मनात दबलेल्या भावना , विचार योग्य व्यक्तींसमोर व्यक्त करा . योग्य पार्टनर शोधा जो तुम्हाला मोकळं होण्यास मदत करेल व तुमच्या विषयी निकष न लावता सर्व गुप्त ठेवेल. त्यालाही तुम्ही मोकळं होण्यास मदत करा .एकमेकांच लक्ष देऊन पूर्ण ऐकून घेतलं तरी माणस मनानी हलकी होतात . हे करत असताना वेळ पडल्यास त्या व्यक्तीला मिठी मारा ( *जादू की झप्पी ) , हात हातात घेऊन पूर्ण समरस होऊन तिला ऐका. ती  रडावयास लागली तर पूर्णतः रडू द्या . दोघांनीही एकमेकांना ठराविक वेळ देऊन असे सेशन घ्या . फक्त 'भावनिक एकमेकांत अडकू नका . कारण आसक्ती  , दुःखाचे कारण आहे*. परदेशात यासाठी काही संस्थांनी स्वमदत गट केले आहेत . यात स्त्री पुरुष दोघेही सामील होतात. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. माझ्या मित्राच्या आईला मी वेळ देऊन तिला पूर्ण बोलते केले ,हातात हात घेऊन तिचे ऐकून घेतले . मिठी मारल्यावर ती ओक्साबोक्सी रडली.ती आज मोकळी झालीय . कुकरची शिट्टी दाबू नका . आतील वाफ रुद्र रूप धारण करून स्फोट होऊ शकतो . म्हणतात ना , मुझे कुछ कहना है , मुझे भी कुछ कहना है । मित्रांनो वेळीच व्यक्त व्हा , अर्थात ढक्कन खोलून टाका. यामुळे मनाची सबलता व निर्मलता वाढते . 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना