शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

" क्रोधाची साखळी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 9:35 PM

क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते..

डॉ.दत्ता कोहिनकर- (माईंड पॉवर ट्रेनर)मित्रांनो, जगाच्या बाजारात  जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या ,समजा एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली त्याला झाप झाप झापले .  त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतुन खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय , पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच दाबून टाकतो .क्रोध ही एक उर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. सायंकाळी हा कर्मचारी कामावरून घरी येतो ,त्याच्या आत दबलेली क्रोधाची ऊर्जा बाहेर पडण्यासाठी दिवसभर धडपडत असते. क्षणार्धात पत्नी काहीतरी गाऱ्हाणे सांगायला लागते, तत्क्षणी हा क्रोध बाहेर पडून पत्नीवर काढला जातो. पती हा परमेश्वर ,तो म्हणेल ती पूर्वदिशा हे आजपर्यंत स्त्रियांच्या मनावर बिंबवल आहे . त्यामुळे पतीच्या आरडाओरडीमुळे तिला आलेला क्रोध ती दाबून टाकते .तेवढ्यात मुलगा शाळेतून घरी येतो, पहाते तर काय, त्याचे सर्व कपडे मातीने मळलेले. यापूर्वी अनेकदा तो ग्राउंडवरून  मळलेल्या कपड्यानिशी घरी आलेला पण तिला कधीच क्रोध आला नव्हता.  आज मात्र ती नवऱ्याने तिच्या अंगावर टाकलेला क्रोध ती मुलाच्या अंगावर टाकते व त्याला बदडते . मुलगा आईला काय करणार? आईने मारल्यामुळे त्याला आलेला क्रोध तो पाटी किंवा वॉटर बॉटल किंवा खेळणे जोरात आपटून तोडतो व त्याचा क्रोध बाहेर काढतो .मित्रांनो ही क्रोधाची साखळी अशा पद्धतीने कार्य करते. व घराघरात अशांतता निर्माण होते. वरपासून  क्रोध का खालपर्यंत वहन होतो .लॉक डाऊनचे नियम तोडल्यानंतर पोलिसांचा काठीचा प्रसाद जोरात मिळतो याचे कारण तुम्हाला आता लक्षात आले असेल. ऊर्जा नष्ट होत नाही तिचं वहन किंवा रूपांतर होत.त्यामुळे क्रोधाची साखळी तोडायची असेल व ज्याला सुखी व्हायच असेल त्याने मनाचा व्यायाम करून मनाला सबल व संयमी बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैली मध्ये मी तुम्हाला फक्त दहा मिनिटाचे आनापान सती ध्यान करावयाची विनंती करतो . हे ध्यान रोज सकाळ-संध्याकाळ करा.कुठल्याही पंथाचा, वर्णाचा ,संप्रदायाचा माणूस हे ध्यान करू शकतो. .यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल बुद्धिमत्ता वाढेल, चंचलता दूर होईल व भय दूर होईल .समतायुक्त मन , इंद्रियाचे व ऊर्जेचे व जीवनाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करू शकते. लॉकडाऊनच्या या काळात घरातच रहा .योग्य आहार घ्या. रोज व्यायाम करा व ध्यानधारणा करा...

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना