खरे कोण? गावकरी की प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:03 PM2019-05-06T22:03:58+5:302019-05-06T22:04:15+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.

Who is true Administration of the village | खरे कोण? गावकरी की प्रशासन

खरे कोण? गावकरी की प्रशासन

Next
ठळक मुद्देआजंतीमधील पाणीटंचाई : दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम, टँकरमुक्तीच्या दाव्याविरूद्ध निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.
पाणीटंचाई आजंती गावाच्या पाचवीला पुजली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गुंडभर पाण्यासाठी महिलांची दिवसभर भर उन्हात पायपीट सुरू असते. पाणीप्रश्न घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेलेल्या शिष्टमंडळातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अर्धवट पाईपलाईन, कोरड्या पडलेल्या विहिरी हे या गावचे आजचे चित्र आहे. या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आजंती टँकरमुक्त झाल्याचे जाहीर केले. या गावाला दरवर्षी नियमित टँकरची गरज भासत होती. मात्र नवीन योजना झाल्यापासून टँकर बंद झाले. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, टंचाईसदृश परिस्थिती नाही, असा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. गावात असलेल्या सहापैकी दोन चार विहिरींना पाणी असून, तीन विहिरीत नळ योजनेचे पाणी सोडले जाते. नऊ पैकी सहा हातपंप सुरू आहे. ४० खासगी विहिरी आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून नळ योजनेचे काम पूर्ण केले आहे, असे उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ग्रामस्थांनी नळ योजनेवरून जोडणी घेणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.
आता गावकऱ्यांनी प्रशासनाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे सांगत नेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाची दिशाभूल केली आहे. मागील ५० वर्षांपासून गाव तहानलेले असताना जिल्हा परिषदेने वस्तूस्थिती लपविली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सतीश अरसोड, आकाश गायकवाड, प्रीतम राठोड, नरेश राठोड, रवींद्र अवघड, घनश्याम ढगे, राजू काळे, प्रेमसिंह चौहान, अनिल काळे, कैलास ढगे, भूषण गुल्हाने, चंद्रकांत गुल्हाने, सागर गुल्हाने, उमेश ढळे, श्याम राऊत, शिवा कठाडे, अजय राऊत, मुनेश्वर अवघड, दिनेश वानखडे आदी उपस्थित होते.

Web Title: Who is true Administration of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.