राळेगावचे ट्रामा केअर युनिट पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:04 PM2018-07-08T22:04:43+5:302018-07-08T22:05:12+5:30

जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे ....

Trauma Care Unit of Ralegaon Completed | राळेगावचे ट्रामा केअर युनिट पूर्णत्वाकडे

राळेगावचे ट्रामा केअर युनिट पूर्णत्वाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देकाम अंतिम टप्प्यात : वडकीला नवीन रुग्णालयाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वडकी येथे ग्रामीण रूग्णालय स्थापन करावे, अशी मागणी आहे.
अडीच कोटी रुपये खर्चून येथे ट्रामा केअर युनिटची वास्तू पूर्णत्वास येत आहे. ट्रामा केअरच्या विविध पदांच्या भरतीकरिता शासनाने सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली. सिमेंट रोडमुळे राळेगाव आता राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले आहे. यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अपघाताच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरु करण्याची आवश्यकता आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, एक डॉक्टर व अन्य काही पदे रिक्त आहेत. बालरोग तज्ज्ञ आणि महिला रोग तज्ज्ञ उत्तम सेवा देत असले, तरी दररोज दोनशे बाह्यरुग्ण व भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या बघता रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची गरज आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख येथे आले असताना त्यांनी दहा वर्षीपूर्वीच आरोग्य विभागाला यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती.
वडकीत ग्रामीण रुग्णालय मंजूर केल्याचा दावा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी केला. मात्र भारत मुक्ती मोर्चा व महिलांनी याच मागणीसाठी आंदोलन केले. तरीही समस्या कायम आहे. त्यासाठी येथे एका अपक्ष नगरसेवकाने धरणे दिले. त्यांना काँग्रेस, भाजप, शिवसेना नगरसेवक, कार्यकर्त्यांनी समर्थन दिले. मात्र पक्षीय आंदोलन करण्यास कुणी तयार नाही.

Web Title: Trauma Care Unit of Ralegaon Completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.