विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:27 PM2018-07-16T22:27:40+5:302018-07-16T22:28:09+5:30

विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.

Shivsena aggressor on insignificance of insurance | विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : खासदारांचे नेतृत्व, जिल्हाभरातील शेतकऱ्यांशी दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.
जिल्ह्यात बोंडअळीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना समान मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावून मदत वाटपात तफावत निर्माण केली. या गंभीर बाबीकडे राज्य शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यात अनेक त्रुटी आढळल्या. यामुळे अनेक गावे मदतीमधून वगळली गेली. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली.
पीकविमा जाहीर करण्यापूर्वी तलाठी पंचनामे करतात. यामध्ये शेताचे उत्पादन काढण्यात येते. ही प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनाच अंधारात ठेवले जाते. गावातील प्रतिष्ठिताना यावेळी बोलावले जात नाही. ही प्रक्रिया कागदोपत्रीच पार पडते. यामुळे पीकविम्याच्या मदतीत तफावत होते. या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्जवितरण प्रणाली मंदगतीने काम करीत आहे. बोंडअळीची मदत अनेकांना मिळाली नाही. तुरीचे चुकारे बाकी आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली.
निवेदन देतेवेळी खासदार भावना गवळी, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण पांडे, उप जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, उमाकांत पापीनवार, विकास जामकर, दिगांबर मस्के, विनोद काकडे, वसंत जाधव, विक्रम बऱ्हाणपुरे उपस्थित होते.
गरज नसताना मागतात सर्च रिपोर्ट
कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका ‘सर्च रिपोर्ट’ मागत आहे. या सर्च रूपोर्टची गरज नसताना पुसदच्या युनियन बँकेने शेतकऱ्यांना मागणी केली. यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला.
पीक कापणीचा विचार व्हावा-भावना गवळी
पीक विमा जाहीर करताना पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरला जातो. मात्र हा प्रयोग कुठल्या सर्वेनंबरमध्ये होणार आहे, कुठल्या गावातील शेतकऱ्याची निवड करण्यात आली, याची कुठलीही माहिती गावकºयांना दिली जात नाही. हा प्रयोग केवळ कागदोपत्रीच होतो, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोग विमा कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पत्रपरिषदेत केली.

Web Title: Shivsena aggressor on insignificance of insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.