लोकमततर्फे सखी सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:25 PM2017-11-13T22:25:29+5:302017-11-13T22:25:42+5:30

सखींच्या कर्तृत्वाला लोकमततर्फे सलाम करण्यासाठी लोकमत सखी सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

Sakshi Samman Award by Lokmat | लोकमततर्फे सखी सन्मान पुरस्कार

लोकमततर्फे सखी सन्मान पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देप्रस्तावाला मुदतवाढ : आता १५ नोव्हेंबरपर्यंत

यवतमाळ : सखींच्या कर्तृत्वाला लोकमततर्फे सलाम करण्यासाठी लोकमत सखी सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. आता प्रस्ताव पाठविण्याची पुन्हा सखींना संधी उपलब्ध झाली असून १५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहे.
स्त्रीशक्तीचे कार्य, कर्तृत्व अतुलनीय आहे. स्त्रीशक्ती म्हणजे स्त्रीत्व आणि अस्तित्व जपणारा एक प्रवाह मानला जातो. या प्रवाहात अनेकींना दिशा सापडली आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवाहात कार्यरत स्त्रियांची दखल घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान आणि अभिमान यांची जाणीव करून द्यावी आणि या सखींच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे सत्कार रुपी सलाम करण्यात येणार आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्वात त्यांच्यापेक्षाही कांकणभर सरस ठरणाºया महिलांचा गौरव करणारा हा सोहळा खास महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या काना-कोपºयातील ध्येयवेड्या सेवाव्रतींचा सन्मान करून त्यांना मानाचा मुजरा करण्याचे ‘लोकमत’ने ठरविले आहे. सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यिक या प्रकारांमध्ये पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया इच्छुक महिलांनी त्यांची संपूर्ण माहिती असणाºया फाईलसह अर्ज आणि आपले छायाचित्र लोकमतच्या कार्यालयात १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या महिलांचा एका शानदार समारंभात गौरव करण्यात येणार असून, इच्छुकांनी लोकमत जिल्हा कार्यालय पृथ्वीवंदन, गांधी चौक, यवतमाळ (०७२३२-२४३११९) या क्रमांकावर संपर्क साधावा. यवतमाळ जिल्ह्यातील ध्येयवेड्या सेवाव्रती महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार असून, अशा उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांनी मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Sakshi Samman Award by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.