बनावट कागदपत्रावर प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट

By admin | Published: September 17, 2015 03:09 AM2015-09-17T03:09:35+5:302015-09-17T03:09:35+5:30

बनावट कागदपत्राच्या आधारे महा ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट पुसद तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती

A racket making a certificate on a fake document | बनावट कागदपत्रावर प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट

बनावट कागदपत्रावर प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट

Next

दोघांविरुद्ध गुन्हा : वेणीच्या महा ई-सेवा केंद्रातील प्रकार
पुसद : बनावट कागदपत्राच्या आधारे महा ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट पुसद तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती असून तालुक्यातील वेणी (खु) येथील महा ई-सेवा केंद्रावरून दोघांनी बनावट कागदपत्रावरून अधिवास प्रमाणपत्र तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हावी, त्वरित प्रमाणपत्र मिळावे यासाठी गत दोन वर्षांपासून ग्रामीण भागात महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात जवळपास ५० च्या आसपास महा ई-सेवा केंद्र आहेत. मात्र आता महा ई-सेवा केंद्रांवर बनावट कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र मिळविणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील वेणी(खु) येथील एका महा ई-सेवा केंद्रातून दोन तरुणांनी अधिवास प्रमाणपत्र तयार करून घेतले. यासाठी त्यांनी रेशन कार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सादर केले होते. संबंधित ई-सेवा केंद्राने सदर कागदपत्रे तपासणीसाठी पुसदच्या तहसील कार्यालयात पाठविले. त्यावेळी नायब तहसीलदार नामदेव इसलकर यांनी तपासणी केली असता रेशन कार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत सदर ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र दोघे जण घेऊन गेले होते. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आजीम गाजी मजेद गाजी व हबीब शेख रूबल शेख दोघेही रा.अमराईपुरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या दोघांच्या प्रमाणपत्रावर १६ आॅगस्ट रोजी प्रमाणपत्र नेल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब तहसीलदार भगवान कांबळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पुसद तालुक्यात असे प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. संबंधित तरुणांचा शोध पोलीस घेत असून वृत्त लिहिस्तोवर या दोघांचाही थांगपत्ता लागला नव्हता. या प्रकाराने तहसील वर्तूळात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: A racket making a certificate on a fake document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.