दिग्रस तहसीलवर नाथजोगी समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:05 PM2018-07-07T22:05:34+5:302018-07-07T22:06:13+5:30

धुळे जिल्ह्यात नाथजोगी समाजातील पाच जणांची जमावाने निघृर्ण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील नाथजोगी समाजाने मोर्चा काढून शनिवारी तहसीलवर धडक दिली.

The movement of the non-stop society on Digras tahsil | दिग्रस तहसीलवर नाथजोगी समाजाचा मोर्चा

दिग्रस तहसीलवर नाथजोगी समाजाचा मोर्चा

Next
ठळक मुद्देधुळे येथील घटनेचा निषेध : मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : धुळे जिल्ह्यात नाथजोगी समाजातील पाच जणांची जमावाने निघृर्ण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील नाथजोगी समाजाने मोर्चा काढून शनिवारी तहसीलवर धडक दिली.
धुळे जिल्ह्यात चोर समजून जमावाने पाच समाज बांधवांची बेदम मारहाण करून हत्या केली. त्या निषेधार्थ तालुक्यातील नाथजोगी समाजाने मोर्चा काढला. शहरात पाऊस सुरु असताना शेकडो समाज बांधव मोर्चात सहभागी झाले. त्यांनी आरोपीना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. त्यातून मृत्युमुखी पडलेल्या त्या पाच समाज बांधवांच्या कुटुंबाला पाच लाखाएंवजी २० लाखांची मदत द्यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, समाजाला ओळखपत्र द्यावे, आदी मागण्या केल्या. नंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात संजय कुकड़ी, रवींद्र अरगडे, सुधीर देशमुख, अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारखी, बाळू जाधव, सुरेश सरोदे, बाबूसिंग जाधव, अरविंद गादेवार, यादव गावंडे व समाज बांधव सहभागी झाले होते.

Web Title: The movement of the non-stop society on Digras tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून