जन्मले ‘उघड्या’ पोटाचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:56 AM2017-07-31T02:56:36+5:302017-07-31T02:56:36+5:30

पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी ‘उघड्या’ पोटाच्या बाळाला महिलेने जन्म दिला. या बाळाच्या पोटावर त्वचेचे आवरण नसल्याने संपूर्ण आतडी उघडी आहे.

janamalae-ughadayaa-paotaacae-baala | जन्मले ‘उघड्या’ पोटाचे बाळ

जन्मले ‘उघड्या’ पोटाचे बाळ

Next

प्रकाश लामणे ।
पुसद (यवतमाळ) : पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी ‘उघड्या’ पोटाच्या बाळाला महिलेने जन्म दिला. या बाळाच्या पोटावर त्वचेचे आवरण नसल्याने संपूर्ण आतडी उघडी आहे. अधिक उपचारासाठी बाळ आणि बाळंंतिणीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
पुसद तालुक्यातील आडगाव येथील संगीता अनिल चव्हाण (२५) ही शनिवारी प्रसूतिसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. रविवारी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास संगीताने बाळाला जन्म दिला. मात्र स्त्रीजातीच्या या बाळाच्या पोटावर त्वचेचे आवरणच नव्हते. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा बाळ जिवंत आणि डोळे उघडत होते. तसेच बाळंतीण संगीताही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती शहरात वाºयासारखी पसरली आणि या बाळाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.

Web Title: janamalae-ughadayaa-paotaacae-baala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.