टोल चुकविण्यासाठी पांढरकवडातून जड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:49 AM2021-09-04T04:49:47+5:302021-09-04T04:49:47+5:30

नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४वरून मालवाहू ट्रक व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू ...

Heavy traffic through whitewashing to avoid tolls | टोल चुकविण्यासाठी पांढरकवडातून जड वाहतूक

टोल चुकविण्यासाठी पांढरकवडातून जड वाहतूक

Next

नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४वरून मालवाहू ट्रक व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. दररोज रात्रंदिवस हजारो वाहने या रस्त्याने जातात. या रस्त्यावर वाय पॉइंटपासून एक किलोमीटर अंतरावर टोल टॅक्स बूथ आहे. टोल टॅक्स चुकविण्यासाठी अनेक मालवाहू ट्रक पांढरकवडा शहरातून चलबर्डी रोडमार्गे बायपास रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गावर जातात. या वाहतुकीमुळे अनेकदा रहदारीस अडथळा येतो. वाहतूकही बरेचदा ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत शहरवासीयांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या आहे. काही दिवस ही वाहतूक बंदही होती. परंतु आता टोल टॅक्स चुकविण्यासाठी ही वाहने सर्रास शहरातून जात आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भरवस्तीतून जाणाऱ्या मालवाहू ट्रकची वाहतूक बंद करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे.

Web Title: Heavy traffic through whitewashing to avoid tolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.