भूसंपादन मोबदल्याची शेतकऱ्यांना हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:22 PM2018-07-16T22:22:15+5:302018-07-16T22:22:34+5:30

Flurry of land acquisition money | भूसंपादन मोबदल्याची शेतकऱ्यांना हुलकावणी

भूसंपादन मोबदल्याची शेतकऱ्यांना हुलकावणी

Next
ठळक मुद्देलाखो रुपये वळविले : राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर वळविल्याचा प्रकार पुढे आला आहे. आर्णी मार्गावर असलेल्या मांगुळ येथील शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये वळते करण्यात आले. एवढेच नव्हे तर या शेतकऱ्यांचे बँक खातेही सील केले होते.
या राष्ट्रीय महामार्गासाठी मांगुळ येथील काही शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यात आली. यापोटीचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र नऊ शेतकऱ्यांच्या खात्यात काही रक्कम ठेऊन उर्वरित रक्कम परस्पर भूसंपादन विभागाने वळती करून घेतली.
इलाहाबाद बँक शाखा भांब(राजा) येथे खाते असलेल्या शेतकºयांविषयी हा प्रकार घडला. यवतमाळ उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी या बँकेला पत्र देऊन संबंधित शेतकऱ्यांचे खाते सील करण्याचे कळविले. अधिक रक्कम देण्यात आल्याने ही कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. महादेव परसराम गाडगे यांच्या खात्यात ४५ लाख ८१ हजार ४६० रुपये जमा झाले होते. त्यांच्या खात्यातून ३५ लाख ५४ हजार ७०० रुपये काढून घेण्यात आले. केवळ दहा लाख ७६ हजार ४०० रुपये त्यांच्या खात्यात ठेवले. ही रक्कम वळती झाल्यानंतर त्यांचे बँक खाते व्यवहारासाठी नियमित करण्यात आले. असाच प्रकार इतर आठ शेतकऱ्यांविषयीसुद्धा झाला आहे. खात्यात जमा झालेली वळती झाल्याने या शेतकºयांना लाखो रुपयांनी हुलकावणी दिली. काही शेतकºयांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

महामार्गाला लागून आणि बायपासची अशा दोन प्रकारासाठी जमिनीचे वेगवेगळे दर आहेत. मंगरुळ येथील जमीन बायपास आहे. अनावधानाने आठ शेतकऱ्यांना महामार्गाला लागूनच्या जमिनीचे दर देण्यात आले. तसे या शेतकऱ्यांना कळविले होते. यानंतरच जादा देण्यात आलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वळती करण्यात आली.
- स्वप्निल तांगडे,
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ

Web Title: Flurry of land acquisition money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.