इंदिरा जिनिंगमध्ये आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:41 PM2019-02-04T21:41:48+5:302019-02-04T21:42:07+5:30

येथील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा कॉटन प्रोसेसर या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कापूस, जिनिंगमधील अनेक यंत्र जळून खाक झाले. त्यात १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत असल्याने ती विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होते.

Fire orange in Indira Jining | इंदिरा जिनिंगमध्ये आगीचे तांडव

इंदिरा जिनिंगमध्ये आगीचे तांडव

Next
ठळक मुद्देवणीतील घटना : ११ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा कॉटन प्रोसेसर या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कापूस, जिनिंगमधील अनेक यंत्र जळून खाक झाले. त्यात १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत असल्याने ती विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होते.
वणी येथील आनंद मामराजजी अग्रवाल यांच्या मालकीची ही जिनिंग आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे कामगार या जिनिंगमध्ये जिनिंग प्रोसेसिंगचे काम करीत असताना ब्लोअरच्या मोटारमधून अचानक शॉटसर्कीट झाले. त्यामुळे आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. तेथे उपस्थित कामगारांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न कसुरू केले. मात्र आग विझण्याऐवजी वाढतच होती. त्यामुळे जिनिंगमधील कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली.
या आगीत २०० क्विंटल कापूस १४ रेचे मशीन, दोन ते तीन ब्लोअर मशीन, २०० क्विंटल कापसाच्या गाठी जळून खाक झाल्याने १० ते ११ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नव्या वर्षापासूनची वणी उपविभागात आगीची ही चौथी घटना आहे. सिंदोला, मुकुटबन, व वणी शहरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत, तर २०१६ ते १७ या एकाच वर्षात या भागात आगीच्या ७० घटना घडल्यात. आगीच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेता, येथे सक्षम अग्नीशमन यंत्रणा नाही, हे विशेष.

अग्निशमन दलाच्या पांगळेपणाचा फटका
आग लागल्यानंतर जिनिंगच्या प्रशासनाने तात्काळ वणी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मात्र वाहन नादुरस्त असल्याचे अग्निशमन यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र नंतर सदर वाहन आग विझविण्यासाठी घटनास्थळावर पोहचले. तोवर अग्निशमन दलाच्या पांगळेपणाचा जिनिंगला चांगलाच फटका बसला. येथील अग्निशमन यंत्रणा २२ वर्षे जुनी आहे. नवीन यंत्रणेचा ७० लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. मात्र तो प्रस्ताव अद्यापही पुढे सरकला नाही.

Web Title: Fire orange in Indira Jining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.