महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:29 AM2024-05-16T11:29:43+5:302024-05-16T11:59:43+5:30

Sharad Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेतून केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

Loksabha Election What is Raj Thackeray position in Maharashtra politics says Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

Sharad Pawar on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे ते प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत. नुकतेच एका सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर आता शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना दोन वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

ठाण्याचे शिवसेनचे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. ज्या शरद पवारांना आघाडीत घेऊन बसला आहात, त्यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत - शरद पवार

"मोदींना बोलायला दुसरं काही नाही त्यामुळे वारंवार ते बोलतात. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना, शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे? शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्यासोबत आहे," असं शरद पवार म्हणाले. यावेळी पक्ष फुटला तेव्हा शरद पवार झोपत होते का असं मोदी म्हणाल्याचे पत्रकाराने म्हटलं. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदींना आमच्या पक्षाची चिंता का? असा सवाल त्यांनी केला.

मोदींना इस्रायल दौऱ्यावर नेले - शरद पवार

"ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा मी इस्त्रायलला चाललो होतो. तेव्हा मोदींनी मला फोन केला. त्यांचा व्हिसा अमेरिकेने नाकारला होता. त्यावेळी त्यांनी मला घेऊन चला अशी विनंती केली. तेव्हा मीच त्यांना इस्रायल दौऱ्यावर घेऊन गेलो," असेही शरद पवार म्हणाले.

Web Title: Loksabha Election What is Raj Thackeray position in Maharashtra politics says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.