रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:59 PM2018-09-17T13:59:23+5:302018-09-17T14:01:32+5:30

वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे.

Power theft from 'Fuse Box'; Mahavitaran |  रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच 

 रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच 

Next
ठळक मुद्दे वीजग्राहकांकडून वीजेच्या चोरीसाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. ‘फ्युज बॉक्स’मधूनच वीजेची चोरी करण्याचा प्रकारही होत असल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी या प्रकाराबाबत अनभिज्ञच असल्याचे स्पष्ट होत आहे.
वारेमाप वीज वापरासाठी देयके अदा करण्याची गरज पडू नये म्हणून वीजग्राहकांकडून वीजेच्या चोरीसाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. यामध्ये खांबावरील वीज तारांवर आकडे टाकणे, वीज मीटरमध्ये बदल करणे किंवा मीटर बायपास करून वीज वापरण्याच्या प्रकाराचा सहसा समावेश आहे; परंतु जिल्ह्यातील काही भागांत थेट वीज रोहित्राखाली सताड उघडे ठेवण्यात येत असलेल्या ‘फ्युज बॉक्स’मधूनच वीजेची चोरी करण्याचा प्रकारही होत असल्याची माहिती मिळाली. याची पडताळणी करण्यासाठी लोकमतच्यावतीने काही ठिकाणी स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यात शेतशिवारात असलेल्या आणि झाडाझुडपांमुळे न दिसणाºया रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये तारा जोडून वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसून आले. महावितरणच्या ठायी ही केवळ चोरी असली तरी, यामुळे अपघात घडून जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तथापि, महावितरण या प्रकाराबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे.


वीजचोरी प्रकरणी मोहिम राबविली जात आहे. वीजचोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
-व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, वाशिम

Web Title: Power theft from 'Fuse Box'; Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.