पीके बहरली; तलावांची पाणीपातळी ‘जैसे थे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:02 PM2017-08-03T20:02:20+5:302017-08-03T20:04:49+5:30

वाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

PK Bihaly; Water level of ponds 'like'! | पीके बहरली; तलावांची पाणीपातळी ‘जैसे थे’!

पीके बहरली; तलावांची पाणीपातळी ‘जैसे थे’!

Next
ठळक मुद्दे१0 दिवसांपासून पावसाची उघडीपसंततधार पाऊस नसल्याने तलावांची पातळी खालावलीस्थिती अशीच कायम राहिल्यास भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरिप हंगामातील पिकांना पोषक असा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची पिके बहरली आहेत. असे असले तरी गेल्या १० दिवसांपासून मोठा तथा संततधार पाऊस अद्याप झाला नसल्याने सर्वच तलावांची पाणीपातळी वाढण्याऐवजी खालावत चालली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अल्पावधीतच भीषण पाणीटंचाई जाणवण्यासोबतच आगामी रब्बी हंगामही धोक्यात सापडण्याची शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस कोसळल्याची नोंद शासनदप्तरी झाली आहे. मात्र, हा पाऊस सलग झाला नसल्याने सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत २ ते ३ टक्क्यांनीही वाढ झाली नसल्याचे जलसंपदा विभागाकडून दर आठवड्यात जाहीर केल्या जाणाºया ‘वॉटल लेव्हल’च्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. अधूनमधून कोसळणाºया पावसामुळे अडचणीत सापडलेल्या खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली नसल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: PK Bihaly; Water level of ponds 'like'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.