१८ डिसेंबरला साजरा होणार अल्पसंख्याक हक्क दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:48 PM2018-12-05T12:48:30+5:302018-12-05T12:49:08+5:30

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याच्या सूचना शासनाने मंगळवार, ४ डिसेंबर रोजी दिल्या आहेत. 

Minority Rights Day to be celebrated on 18th December | १८ डिसेंबरला साजरा होणार अल्पसंख्याक हक्क दिवस

१८ डिसेंबरला साजरा होणार अल्पसंख्याक हक्क दिवस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव होण्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याच्या सूचना शासनाने मंगळवार, ४ डिसेंबर रोजी दिल्या आहेत. 
यामाध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विजेत्यांना पारितोषिक, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यासाठी १० लक्ष रुपयांपयंतच्या खर्चासही शासनाने मान्यता दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Minority Rights Day to be celebrated on 18th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम