जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 03:37 PM2019-12-04T15:37:37+5:302019-12-04T15:37:48+5:30

१ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.

Extra irrigation through the Water Power Mission | जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन फाऊंडेशन, युनिसेफ इंडिया आणि भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या जलशक्ती अभियानात जिल्हयातील १० गावांचा समावेश असून, या गावांमध्ये १ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.
या अभियानात जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाई, किनखेड, वढवी, लोहारा, किसाननगर, शेवती, मांडवा तसेच मालेगाव तालुक्यातील कवरदरी, वाडीरामराव व पिंपळशेंडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पेयजल आणि आरोग्य विभागाने जलशक्ती अभियान ही मोहिम आखून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २० गटांची निवड केली होती. यात वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा ८ जुलै २०१९ 9 ते १५ सप्टेंबर २०१९ असा होता. दुसरा टप्पा १ आॅक्टोबर रोजी सुरू झाला आणि ३० नोव्हेंबर २०१९ रोजी समाप्त झाला. या कालावधीत जिल्ह्यातील १० गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक साह्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे, शॉक पिट, रुफटॉप रेन वॉटर, पब्लीक वॉल रिचार्ज शॉफ्ट, नाला अशी जलसंधारणाची कामे करण्यात आली. वनीकरणाची कामे, व्हीएसटीएफ प्रकल्पातील १० गावात प्रभावीपणे राबविण्यात आली. या कामांमुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचा दावा यंत्रणेला केला. या पाण्याचा लाभ १९५२ कुटुंबांना होणार असून यात ६०६६ महिला तर ५५३ बालकांनाही होणार आहे. जल शक्ती अभियानामध्ये केलेले नियोजन, क्षमता निर्मितीसाठीचे प्रयत्न, अंमलात आणलेल्या प्रक्रिया, भागीदारी, तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर या सर्व घटकांमुळे यश अधोरेखीत झाले आहे. ग्रामीण भागात सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशांचा सहभाग आणि पंचायती राज्ज पद्धती अधिक मजबूत व्हावी यासाठीची कार्यपद्धती कौतुकास्पद असून या सर्व गोष्टींचे अनुकरण जिल्ह्याच्या इतर भागात करून तेथेही पाणी सुरक्षेसाठी प्रयत्न करता येतील, असे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Extra irrigation through the Water Power Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.