कुणबी-आदिवासी हे जिल्ह्याची दोन चाके

By admin | Published: May 13, 2017 12:36 AM2017-05-13T00:36:50+5:302017-05-13T00:36:50+5:30

कुणबी व आदिवासी हे पूर्वीपासून जिल्ह्यात गुण्यागोविंदाने राहत असून हे दोन्ही समाज म्हणजे जिल्ह्याच्या रथाची दोन चाके आहेत.

Kunabi-tribals are two wheels of the district | कुणबी-आदिवासी हे जिल्ह्याची दोन चाके

कुणबी-आदिवासी हे जिल्ह्याची दोन चाके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : कुणबी व आदिवासी हे पूर्वीपासून जिल्ह्यात गुण्यागोविंदाने राहत असून हे दोन्ही समाज म्हणजे जिल्ह्याच्या रथाची दोन चाके आहेत. या दोन्ही समाजाने हातात हात घालून बरोबरीने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे बोलतांना केले. ते वाड्यातील गांधरे येथील कुणबी समाजगृह येथे बोलत होते. समाजातील गुणवंत हीच समाजाची खरी संपत्ती असून या गुणवंताची कदर केली पाहीजे व समाजातील या गुणवंताचा आदर्श इतरांनी नक्की घ्यावा, असं आवाहनही यावेळी सवरा यांनी केले.
वाडा तालुक्यातील सरस ओहोळ गावचे किशोर देवराम ठाकरे यांना ठाणे वनविभागात सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यानिमित्ताने कुणबी समाज मंडळ वाडा-विक्र मगड यांच्यावतीने गांधरे येथील कुणबी समाजगृहाच्या प्रागंणात भव्य कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामिगरी करणार्या गुणवंताचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात निलेश सांबरे (सामाजिक क्षेत्र), चिन्मय पाटील (आयएसीएस) अर्थ मंत्रालय भारत सरकार, यतिश पाटील (आयआरएस), कौस्तुभ ठाकरे (सेंट्रल एआरएम फोर्स), पराग दुपारे (अनुशास्त्रज्ञ), प्रदीप पाटील (सब डीएफओ), प्राजक्ता पाटील (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर), प्रशांत दुपारे (आर्किटेक्ट), गायत्री पाटील, स्नेहा पाटील (सी.ए.), शिल्पा पाटील, तृप्ती म्हस्कर, योगेश पाटील, योगिनी पाटील (पीएचडी), यतीन पाटील (पीएसआय) तर प्रज्ञा शोध परीक्षेत सलग दुसर्यांदा राज्यात प्रथम आलेल्या मानसी पाटील यांचाही मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी खासदार चिंतामण वनगा यांनी वनौषधींची लागवड हा शेतकऱ्यांसाठी पुरक व्यवसाय होऊ शकतो व त्यासाठी किशोर ठाकरेंसारखे चांगले अधिकारी शेतकऱ्यांना नेहमीच मदत करतील, अशी आशा व्यक्त केली. तर आमदार पांडुरंग बरोरा यांनी अत्यंत खुमासदार शैलीत वाड्याची माती कशी दमदार आहे, हे उदाहरणासह सांगितले. तसेच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना सतावणाऱ्या व जाचक ठरलेल्या वन संज्ञा, ३५ सेक्शन व इको सेंसिटिव्ह झोन उठविण्याबाबत समाजातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्र माचे प्रास्ताविक सत्कार समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी गांधरे येथील कुणबी समाज मंडळाच्या जागेत समाजगृहाची भव्य इमारत उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी चार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी सढ्ळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या. आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला व अंदाजे दोन कोटीचा निधी या कार्यक्र माच्या दरम्यान विविध दात्यांनी जाहीर केला.
कार्यक्र माचे आभारप्रदर्शन समितीचे खजिनदार विलास आकरे यांनी केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन बी.के. पाटील व वैष्णवी गव्हाळे यांनी केले. याचवेळी महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्र माचे आयोजनही करण्यात आले होते. यासाठी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

Web Title: Kunabi-tribals are two wheels of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.