जव्हारमधील ‘त्या’ रुग्णवाहिकेला अपघात विमाच नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:31 AM2018-04-25T02:31:59+5:302018-04-25T02:31:59+5:30

प्रशासनही अनभिज्ञ : कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नाहीत, आरोग्य विभागाचे पितळ पडले उघडे

The 'ambulance' in Jawarah had no accidental injury | जव्हारमधील ‘त्या’ रुग्णवाहिकेला अपघात विमाच नव्हता

जव्हारमधील ‘त्या’ रुग्णवाहिकेला अपघात विमाच नव्हता

googlenewsNext

जव्हार : काही दिवसांपूर्वी जव्हार शहरात पाचबत्ती नाका येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत येथील रुग्णवाहिकेने अपघात घडविला होता. यात रुग्णवाहिकेचा चालक सुधीर बोरसेचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अधिक तपासाकरीता जव्हार पोलीसांनी साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाहनाचे कागदपत्रे मागीतले परंतू त्यांच्या कडे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी देसले यांनी जिल्हा परिषद ठाणे यांचकडून वाहनाचे आर. सी. बुक मिळविले त्याखेरीज कुठलेच कागदपत्र प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.
पालघर जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या शासनाच्या रुग्णवाहिका विना कागदोपत्री चालत असून त्यांच्याकडून झालेल्या अपघातात चुकी नसलेल्यांनाही मरन यातना भोगाव्या लागत आहे. मद्यधुंदावस्थेत रुग्णवाहिकाचा चालक वाहन बेदरकारीने चालवत होता. यात अवैध भाताची वाहतूक करीत होता. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. त्यातील फक्रुद्दीन याला पायाचे अपंगत्व पत्कारावे लागले आहे.
तसेच वाहनाला विमा नसल्यामुळे जोखीम भरपाई मिळाणार कशी? असा प्रश्न निर्माण होतो, याबाबत आरोग्य विभाग असे म्हणते की, शासकीय रुग्णवाहिकाला अपघात विम्याची गरज नाही, याबाबत अद्याप सविस्तर माहिती देता येणार नाही. तसेच आरोेग्य विभागाने ठेका पद्धतीवर असलेल्या वाहनचालकाला तात्काळ निलंबीत केले. मात्र, यात ज्या ज्या कर्मचारी व अधिकाºयांकडून दिरंगाई झाली अश्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी अपघात पिडीत मुद्दसर मुल्ला यांनी केली आहे. तसेच अपघातात झालेल्या नुकसानाची पुर्णपणे भरपाई मिळण्या करीता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे.

रुग्णवाहिकेच्या कागदपत्रांची सर्व जबाबदारी संबंधित वैद्यकिय अधिकाºयाची असते, तालुक्याला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य
अधिकारी, पालघर

चौकशी सुरू आहे, लवकरच वरीष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल.
- डॉ. किरण पाटील, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी

कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नव्हती, ती जिल्हा परिषद पालघर येथून मागविण्यात आली आहेत, यात आर. सी. बुकची पत्र पोलीसांना देण्यात आली आहे.
- डॉ. किशोर देसले, वैद्यकिय अधिकारी,
प्रा. आ. केंद्र साखरशेत

Web Title: The 'ambulance' in Jawarah had no accidental injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.