वर्ध्यात मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने केला सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 03:41 PM2019-02-12T15:41:26+5:302019-02-12T15:41:53+5:30

मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून उभ्या कारला धडक दिली.

A spiral traveler made the driver seven-wheelers and four bicycle slices in the year | वर्ध्यात मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने केला सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा

वर्ध्यात मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने केला सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून उभ्या कारला धडक दिली. हा ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवीत याच भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलीचाही चुराडा केला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्थानक मार्गावरील महावीर भोजनालयासमोर घडली. सदर अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक शास्त्री चौक येथून बजाज चौकाच्या दिशेने एम.एच. ३१ सी. क्यू. ५२०५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स जात होती. याच भरधाव ट्रॅव्हल्सने सुरूवातीला एम.एच.३२ सी. ४१३१ क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल्सचालकाने सदर वाहनासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रसंगी सदर आरोपी ट्रॅव्हल्स चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाची गती वाढवित रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम. एच. ३१ डी.पी. ११४९, एम. एच. ३२ डब्ल्यू. १३४८, एम. एच. ३२ ए.ई. ८००६, एम. एच. ३२ व्ही. ०८४३, एम. एच. ३२ एच. १५७०, एम. एच. ३२ एच. ५०७०, एम. एच. ३२ ए.सी. ४५५० या दुचाकींसह चार सायकलींचा चुराडा करून महावीर भोजनालयाच्या पुढे असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली. या विचित्र अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्ससह कार, दुचाकी व सायकलींचे नुकसान झाले आहे. अपघात होताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आरोपी ट्रॅव्हल्स चालकाला चांगलाच चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीद, सुभाष गावडे, वाघमारे, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे भोसले, जाधव, फुलगोबे, भगत, भोयर, सुरकार तसेच मार्शल पथकाचे शेंडे, दाते, मसके, लंगडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे.

Web Title: A spiral traveler made the driver seven-wheelers and four bicycle slices in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात