रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:29 PM2017-12-27T23:29:31+5:302017-12-27T23:29:42+5:30

काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

The Roha has destroyed the crop | रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

Next
ठळक मुद्देतुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नामदेव जयराम हांडे यांचे घोराड-खापरी रस्त्यालगत डोरली शिवारात १.१७ आर एवढी जेमतेम शेती आहे. या शेतात कपाशी पिकात आंतरपीक म्हणून दुहेरी तासाची तूर लागवड केली. पिकही चांगले आले. जवळपास ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल, अशी शेतकºयाला अपेक्षा होती; पण रोह्यांनी तुरीच्या २० सारण्यांतील पीक उद्ध्वस्त केले. एवढ्याच शेतावर ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीच्या आंतरपिकापासून ४० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. याबाबत शेतकऱ्याने केळझर येथील वनविभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. वनविभागाच्या चौकशी, पंचनाम्यानंतरच शेतकऱ्याला मदत मिळू शकेल. नापिकी व भावबाजीत अडकलेल्या शेतकऱ्यांना रोही, रानडुकरांचे कळप आर्थिकदृष्ट्या हतबल करीत असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

Web Title: The Roha has destroyed the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.