रेल्वे रूळामध्ये दडवलेला दारूसाठा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:34 PM2017-12-20T23:34:09+5:302017-12-20T23:35:48+5:30

स्थानिक आनंदनगर भागातील गावठी दारू निर्मात्यांनी हिंगणघाटकडे जाणाºया रेल्वेरूळ परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला मोह रसायन सडवा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबवून नष्ट केला.

Poor liquor barbed in the railroad rail | रेल्वे रूळामध्ये दडवलेला दारूसाठा नष्ट

रेल्वे रूळामध्ये दडवलेला दारूसाठा नष्ट

Next
ठळक मुद्देवॉश आऊट मोहीम : एसपीच्या विशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक आनंदनगर भागातील गावठी दारू निर्मात्यांनी हिंगणघाटकडे जाणाºया रेल्वेरूळ परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला मोह रसायन सडवा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबवून नष्ट केला. नष्ट करण्यात आलेला मोह रसायन सडवा १० लाखांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात दारूविक्रेत्याविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या काही दिवसानंतर इंग्रजी नवीव वर्षाचे स्वागत नागरिकांकडून केले जाणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यस्था कायम राहावी या हेतूने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती करण्यात येणाºया आनंदनगरात पोलिसांनी सकाळी छापा टाकला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी जेसीबीच्या सहाय्याने दारूविक्रेत्यांकडून रेल्वेच्या परिसरात रेल्वेरुळाच्या बाजूला जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेत तो नष्ट केला. या वॉश आऊट मोहिमेदरम्यान पोलिसांनी सुमारे १० लाखांचा कच्चा मोहरसायन सडवा नष्ट करीत लोखंडी ड्रम ताब्यात घेतले. सदर प्रकरणी अज्ञात दारूविक्रेत्यांविरुद्ध शहर पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, श्रीकांत कडू, जमादार प्रमोद जांभुळकर, गजानन कठाणे, धर्मेश अकाली, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, संजय राठोड यांच्यासह मार्शल पथकाच्या पोलिसांनी केली.
 

Web Title: Poor liquor barbed in the railroad rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.