भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:56 PM2018-04-13T23:56:31+5:302018-04-13T23:56:31+5:30

केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ...

In the hands of citizens in the morning, spade, basket and shovel | भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे

भल्या पहाटेच नागरिकांच्या हातात कुदळ, टोपले व फावडे

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीदार गावासाठी नागरिकांची धडपड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला जिल्ह्यात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन गाव परिसर पाणीदार करण्यासाठी श्रमदानाला लागल्याचे दिसते आहे.
परसोडी या गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेत आपण बाजी मारायची हा द्रुढ निश्चय तेथील ग्रामस्थांनी केला आहे. संपूर्ण गावच श्रमदानासाठी पुढाकार घेत आहे. तीन दिवसात श्रमदानाच्या माध्यमातून पाणीदार गाव कसे होेईल या हेतूने बरीच कामे ग्रामस्थांनी केली. त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. नामदेव आखाडे यांच्या मार्गदर्शात विविध कामे होत असून तहसीलदार विजय पवार व अभियंता मंदार देशपांडे यांनी कामांची पाहणी केली. यावेळी साहित्य वितरीत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेखा पंधरे, नामदेव आखाडे आदींची उपस्थिती होती.
श्रमदानाचे स्थळ व वाहतूक व्यवस्था
१४ एप्रिलला देवळी तालुक्यातील गिरोली येथे श्रमदान होणार आहे व १५ एप्रिलला आर्वी तालुक्यातील बोदड येथे श्रमदान होणार आहे. सदर दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पावडे नर्सिंग होम, बॅचलर वर्धा येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ रोजी आर्वी तालुक्यातील टेंभरी, परसोडीसाठी आदर्श कॉम्पुटर, गजानननगर येथून सकाळी ६ वाजता बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
 

Web Title: In the hands of citizens in the morning, spade, basket and shovel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.