मानवाधिकार सभेत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा

By admin | Published: May 30, 2014 12:18 AM2014-05-30T00:18:56+5:302014-05-30T00:18:56+5:30

मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी,

Discussion on the sufferings of security personnel in the Human Rights Conference | मानवाधिकार सभेत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा

मानवाधिकार सभेत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा

Next

वर्धा : मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी, कारखाने, प्रतिष्ठान, महाविद्यालये, शाळांत कार्यरत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा करण्यात आली.
विविध ठिकाणी सुरक्षा कर्मचारी कंत्राटदारांतर्गत कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांनी सभेत आपल्या व्यथा तक्रारीच्या माध्यमातून मांडल्या. यात सुरक्षा कर्मचार्‍यांचे वेतन नियमानुसार नाही, रोजंदारीचे न्यूनतम वेतन मिळत नाही, अल्प वेतनात काम करावे लागते, जबाबदारी मात्र मोठी असते, साप्ताहिक सुटी दिली जात नाही आदींचा समावेश आहे. यात साप्ताहिक सुटी नियमाप्रमाणे देण्यात यावी, ठेकेदार सुरक्षा कर्मचार्‍यांचा निर्वाहभत्ता, भविष्य निर्वाह निधीत जमा करीत नसल्याने पेन्शन मिळत नाही, सुरक्षा कर्मचारी कामावर असताना सुरक्षित नसतो, त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. कदाचित एखाद्या प्रसंगात कामावर असताना जखमी झाला तर त्याचा उपचार कंत्राटदार करीत नाही. राज्य कर्मचारी विम्याच्या दवाखान्यातून उपचार केले जातात; पण त्यासाठी कंत्राटदाराने सुरक्षा कर्मचार्‍यांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर रूजू होताच ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आगाऊ कर्तव्य बजावल्यास ओव्हरटाईम दिला जात नाही. सुरक्षा कर्मचार्‍यांना पूर्ण ड्रेस दिला जात नाही. यात जोडे, बेल्ट, मोजे, कॅप, शिटी आदी वस्तू दिल्याच जात नाहीत. काही सुरक्षा रक्षक कंपन्यांमध्ये शर्टच दिले जातात. फुलपॅन्ट तुमचाच वापरा, असे सांगतले जाते. ओळखपत्रही दिले जात नसल्याचे यावेळी कर्मचार्‍यांद्वारे सांगण्यात आले.
कंत्राटदार सुरक्षेच्या नावावर अमाप पैसा कमवितात; पण सुरक्षा कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसारही वेतन देत नसल्याने अनेक कर्मचार्‍यांची ओढताण होते. बहुतांश कंत्राटदारांजवळ सुरक्षा रक्षक एजेंसी चालविण्याचा परवाना नाही. सुरक्षा कर्मचारी याबाबत अनभिज्ञ आहे. नाईलाज म्हणून कंत्राटदार देतील त्या वेतनावर सुरक्षा रक्षक काम करतात. सुरक्षा कर्मचारीच सुरक्षित नसेल तर तो संबंधित कंपनी वा प्रतिष्ठानाला काय सुरक्षा देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षा कर्मचार्‍यांना न्याय मिळाला, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संबंधित अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभेचे संचालन मित्रजित मेंढे यांनी केले तर आभार लता बोबडे यांनी मानले. सभेला हमीद शेख, चांद शेख, शेख बापुमीया मालाधरी, अँड. नवनीत पवार, अँड. स्वाती नामदेव बोकडे, नरेंद्र इंगोले, भाऊराव बांगडे, मदन दांडेकर, सचिन क्षीरसागर, अँड. शिरीष दामले, अँड. मेश्रामकर, अँड. पाटील, आशा सूर्यवंशी, सखाराम फुलझेले, प्रसाद गुप्ता आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
 

Web Title: Discussion on the sufferings of security personnel in the Human Rights Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.