दत्ता मेघेंच्या उडीने भाजपच्या गटाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:42 PM2018-05-19T23:42:00+5:302018-05-19T23:42:00+5:30

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्वपक्षीयांकडून नाराजीचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली असताना माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी सावंगी येथे पत्रकार परिषद घेवून भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

Datta Meghna's jump relief to BJP's group | दत्ता मेघेंच्या उडीने भाजपच्या गटाला दिलासा

दत्ता मेघेंच्या उडीने भाजपच्या गटाला दिलासा

Next
ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीत भाजपला निश्चित विजय मिळेल- दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्वपक्षीयांकडून नाराजीचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली असताना माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी सावंगी येथे पत्रकार परिषद घेवून भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. मेघे यांच्या या राजकीय खेळीने भारतीय जनता पक्षाच्या खेम्याला दिलासा मिळाला आहे. या पत्रकार परिषदेत भाजपसह अन्य काही पक्षांचे नगरसेवकही उपस्थित होते. तिनही जिल्ह्यात भाजपला चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा ही माजी खासदार मेघे यांनी केला.
भाजपची स्थिती या निवडणुकीत डामाडौल होत असताना आपल्याला स्थिती सावरण्यासाठी बोलाविण्यात आले काय? असा प्रश्न मेघे यांना विचारताच आपण या निवडणुकीसाठी येणारच होतो. आता निश्चितपणे पक्षासाठी काम करायचे आहे व आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप सोडायची नाही, असे ठरविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इतर पक्षातील ही अन्य मतदार भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवार डॉ. रामदास आंबटकर यांंनी दत्ता मेघे यांच्याशी गत तीस वर्षांपासूनचे संबंध आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असताना नॉर्थ ईस्टच्या विद्यार्थ्यांना मेघे यांच्याकडून मोठी मदत केली जात होती, अशी माहिती त्यांनी दिली. ते अनेक संस्था व व्यक्तींच्या पाठीशी चांगल्या कामाकरिता उभे राहिलेत, असा ही उल्लेख आंबटकर यांनी केला. शिवसेना आपल्या सोबत प्रचारात कुठेही दिसली नाही, असा प्रश्न आंबटकर यांना यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावर आंबटकर म्हणाले की, राज्यपातळीवरून तीन-तीन जागेंचे वाटप झालेले आहे. त्यामुळे शिवसेना आमच्या सोबतच राहील यात काही शंका नाही. आपण सेनेच्याही अनेक नेत्यांना व मतदारांना भेटलो. जवळपास ९०० मतदारांशी संपर्क केला, असे त्यांनी सांगितले. भाजप मधील मतदार नाराज असले याचा अर्थ ते काँग्रेसला मतदान करतील असा होत नाही. ही कौटुंबिक नाराजी आहे व ती दूर केली जाईल, असेही यावेळी दत्ता मेघे म्हणाले. या पत्रकार परिषदेला आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, वर्धा न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

Web Title: Datta Meghna's jump relief to BJP's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.