२५९ जि.प. शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:31 PM2017-10-07T23:31:02+5:302017-10-07T23:31:13+5:30

जिल्हा परिषदेतील २५९ शिक्षकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या होत आहेत. या बदल्या दिवाळीसमोर करू नका, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलने केली आहे.

25 9 zp Stop teacher transfers | २५९ जि.प. शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या थांबवा

२५९ जि.प. शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या थांबवा

Next
ठळक मुद्देभाजप शिक्षक सेलची मागणी : जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेतील २५९ शिक्षकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या होत आहेत. या बदल्या दिवाळीसमोर करू नका, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलने केली आहे. याबाबत जिल्हा संयोजक मोहन मोहिते व पदाधिकाºयांनी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना निवेदन सादर केले.
२७ फेब्रुवारीच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार तथा १२ सप्टेंबरच्या शुद्धीपत्रकानुसार जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ३० सप्टेंबर रोजी बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर झाली. तेव्हा भाजप शिक्षक सेलने या बहुतांश शिक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या तक्रारी एकून घेतल्या. जि.प. अध्यक्षांसमोर एका निवेदनातून ही बाजू मांडण्यात आली आहे. यावेळी नितीन मडावी यांनी दिवाळीत होणाºया बदल्या थांबविण्याचे आश्वासन दिले.
या बदल्यांमध्ये संवर्ग १ मधील १२८ शिक्षक आणि संवर्ग २ मधील १३१ शिक्षकांचा समावेश आहे. बदल्या होणे (करणे) हा प्रशासनाचा एक भाग आहे. हे खरे असले तरी अर्धे शैक्षणिक सत्र झाले असताना व समोर दिवाळीसारखा सण असताना शिक्षकांना ही शिक्षा देऊ नये. आपण उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्यांच्या सत्रामध्ये या बदल्या कराव्यात. आता सध्या तरी त्या थांबवाव्यात, अशी आक्रमक भूमिका शिक्षक सेलने घेतली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपलेल्या असतात. यामुळे बदल्यांचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होणार नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. पालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. दिवाळीत होणाºया बदल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर परिणाम होऊ शकतो.
अनेक शिक्षकांनी कॉन्व्हेंट संस्कृतीला फाटा देत विद्यार्थी जि.प. शाळांकडे आणण्याचा आटोकात प्रयत्न केला. जि.प. शाळांचा पट व दर्जा वाढविण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या प्रयत्नांवरही असुरक्षिततेचे सावट पसरले आहे.
सत्राच्या प्रारंभापासून दिवाळी पर्यंतच्या प्रथम सत्रात सर्व विद्यार्थी हे शिक्षकांच्या स्वभाव, शिकविण्याची पद्धती व आत्मीयता यांच्याशी परिचित झालेले असतात. चिमुकल्यांच्या मनातील भीती निघालेली असते. ते शिक्षकांशी समरस झालेले असतात. त्यांची शिक्षणाची लय तोडून नवीन शिक्षकांच्या हाती या चिमुकल्यांना सोपविणे हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे निवेदनात नमूद आहे. या मोबदल्यात ज्याप्रमाणे संवर्ग १, २ व ३ ला सवलत मिळाली तशी संवर्ग ४ ला देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना प्रा. नरेश जरोदे, प्रा. मधुकर साटोणे, प्राचार्य उज्वला पाटील, संजय भस्मे, दत्तराज भिष्णुरकर, गोडे, मोहन गलांडे, घनश्याम ढोले, अरुण कहारे, सदानंद वानखेडे आदी उपस्थित होते.
बदल्यांमुळे प्रभावित होणारे शिक्षक
जिल्ह्यातील जि.प. च्या २५९ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या प्रस्तावित आहेत. या बदल्यांमुळे सर्वच तालुके व त्या शाळांतील शिक्षण प्रभावित होणार आहे. यात वर्धा तालुका १११ शिक्षक, सेलू तालुका २१ शिक्षक, देवळी ८ शिक्षक, आर्वी ३१ शिक्षक, आष्टी २६ शिक्षक, कारंजा तालुका ९ शिक्षक, हिंगणघाट तालुका ३५ आणि समुद्रपूर तालुक्यातील १८ शिक्षकांचा समावेश आहे.

Web Title: 25 9 zp Stop teacher transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.