ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:46 AM2018-11-01T00:46:58+5:302018-11-01T00:47:19+5:30

बाजारातील १४ फटाक्यांची केली तपासणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली ध्वनिपरीक्षा

The sound of Thane crackers | ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

Next

ठाणे : फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने बुधवारी ठाण्यात फटाक्यांची ध्वनिपातळी तपासणी झाली. या तपासणीमध्ये ठाण्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे १४ मोठ्या फटाक्यांपैकी सर्वच फटाके विहीत ध्वनिमर्यादेत असल्याचे आढळले. त्यामुळे हे सर्वच फटाके या तपासणीत पास झाले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दरवर्षी विभागनिहाय फटाक्यांच्या ध्वनिपातळीची तपासणी केली जाते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. ठाणे विभागातील फटाक्यांची तपासणी बुधवारी दुपारी रायलादेवी लेक प्रिमायसेस येथे करण्यात आली. ठाणे मार्केटमधून विविध कंपन्यांचे सुमारे १४ फटाके तपासणीसाठी आणले होते. यावेळी व्होल्वोबॉम्ब, सद्दाम आॅटोबॉम्ब, वुल्कॅनो, पेंटा स्काय फ्लॅश, रेड गार्लंड क्रॅकर्स ५०००, दसेरा क्रॅकर्स, १२ स्टार ग्रीन, ३० वंडर्स, क्लाउड रायडर्स, गिक्सर्स या सगळ्या फटाक्यांची ध्वनिपातळी मर्यादेपेक्षा कमी आढळून आली.

रात्री १० नंतर फटाके फोडल्यास गुन्हे
कल्याण : दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहेत. त्यामुळे रात्री १० नंतर फटाके वाजवणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या मदतीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायुप्रदूषण होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० नंतर फटाके वाजवणाºयांवर परिमंडळ-३ मधील पोलीस कारवाई करणार आहेत, असे ते म्हणाले.

फटाकेविक्रेत्यांना कलम १४९ अंतर्गत ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके न विकण्याची नोटीस दिली जाणार आहे. शांतता क्षेत्र, रहिवासी आणि औद्योगिक परिसरासाठी ध्वनिमर्यादा आखली आहे. मोठ्या आवाजाचे फटाके विकणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवासी संकुलांमध्ये जागृतीही करणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कुठे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्यासाठी विशेष पोलीस पथके नेमण्यात येतील. या पथकांकडे डेसिबल मशीन असणार असून त्याआधारे ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होत आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया ठिकाणांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आणि डेसिबल मशीनच्या साहाय्याने कारवाई केली जाईल.

या फटाक्यांच्या आतषबाजीत हे प्राणी आणि पक्षी जखमी होऊन त्यांना इजा होते. तसेच, मानसिक आघातही होतो. गेल्या काही वर्षांत अनेक पक्षी आणि प्राण्यांवर उपचार केले. - महेश बनकर, पक्षिमित्र
फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत आम्ही विद्यार्थ्यांत जागृती करत आहोत. फटाके घेण्याऐवजी गरिबांना अन्नदान करावे, असे आवाहन केले आहे. - जीवन विचारे,
एनएसएस कार्यक्रम अधिकारी

ध्वनी आणि वायुप्रदूषणामुळे होणारे शारीरिक तसेच मानसिक आजार पाहता नागरिकांनी कमीतकमी आवाजाचे फटाके फोडावेत. रस्त्यांवर फटाके वाजवताना काळजी घ्यावी. नागरिकांना त्रास किंवा इजा होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवू नयेत. कोणी असे करत असल्यास नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती द्यावी.
- प्रताप दिघावकर,
अपर पोलीस आयुक्त

Web Title: The sound of Thane crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.