ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सात जणांची उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 07:13 PM2019-04-08T19:13:40+5:302019-04-08T19:21:16+5:30

विद्यमान खासदार व शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह काँग्रेस राष्टÑवादी आघाडीचे आनंद परांजपे या प्रमुख उमेदवारांनी सकाळी मुहूर्ताच्या वेळेत उमेदवारी अर्ज आज दाखल केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रारंभी विचारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व कन्या उपस्थितीसह नंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकार आदी उपस्थित होते.

Selection of seven candidates for the main parties of the Thane Lok Sabha constituency, including seven candidates | ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सात जणांची उमेदवारी दाखल

विचारे यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकार

Next
ठळक मुद्देआतापर्यंत या मतदारसंघात ११ जणांची उमेदवारी दाखल९ एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी आज सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत या मतदारसंघात ११ जणांची उमेदवारी दाखल झाली आहे. ९ एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
विद्यमान खासदार व शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे आनंद परांजपे या प्रमुख उमेदवारांनी सकाळी मुहूर्ताच्या वेळेत उमेदवारी अर्ज आज दाखल केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रारंभी विचारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व कन्या उपस्थितीसह नंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकार आदी उपस्थित होते. तर परांजपे यांच्यासोबत उमेदवारी दाखल करताना आमदार जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी आमदार मुज्जफर हुसेन आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रभाकर जाधव,सर्वोदय भारत पार्टीचे बृह्मदेव पांडे, भारत जन आधार पार्टीचे अजय गुप्ता, हिंदुस्थान निर्माण दलचे ओंकारनाथ तिवारी आणि डॉ. अक्षय झोडगे या अपक्ष उमेदवाराने आज उमेदवारी दाखल केली आहे.

Web Title: Selection of seven candidates for the main parties of the Thane Lok Sabha constituency, including seven candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.