ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या अनामत रकमेसाठी २५ हजार रूपयांची चिल्हर

By सुरेश लोखंडे | Published: April 8, 2019 05:19 PM2019-04-08T17:19:37+5:302019-04-08T17:26:05+5:30

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. त्यासाठी आशिर्वाद घेण्यासाठी त्यांनी मतदारांचा आशिर्वाद घेतला. सुमारे आठ दिवस मतदारांच्या भेटीगाठी करीत असताना त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी नाण्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत घेवून सुमारे २५ हजार रूपये प्राप्त केले.

25 thousand rupees Chillhar for the deposit amount for the candidature of Thane Lok Sabha constituency | ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या अनामत रकमेसाठी २५ हजार रूपयांची चिल्हर

अनामत रकमेसाठी (डीपॉजिट) दहा रूपयांसह पाच , दोन, एक रूपया आणि ५० पैसे आदींची नाणी असलेली २५ हजार रूपयांची चिल्लर

Next
ठळक मुद्देअनामत रकमेसाठी (डीपॉजिट) दहा रूपयांसह पाच , दोन, एक रूपया आणि ५० पैसे आदींची नाणी असलेली २५ हजार रूपयांची चिल्लर चिल्लर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोजून दिली. त्यास सुमारे दीड तास लागल्याचे बोलले जात आहेया दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली

ठाणे : येथील ठाणे लोकसभा मतदार संघासाठी मराठा क्रांती पुरस्कृत उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहे. त्यासाठी भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेसाठी (डीपॉजिट) दहा रूपयांसह पाच , दोन, एक रूपया आणि ५० पैसे आदींची नाणी असलेली २५ हजार रूपयांची चिल्लर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोजून दिली. त्यास सुमारे दीड तास लागल्याचे बोलले जात आहे.
                          या ठाणे लोकसभा मतदार संघातून मराठा क्रांती पुरस्कृत उमेदवार विनोद लक्ष्मण पोखरकर हे उमेदवारी दाखल करीत आहेत. अनामत रकमेसाठी २५ हजार रूपयांची नाणी असलेल्या दोन पिशव्या घेऊन ते सहकारी कार्यकर्त्यांसर्ह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि मतदार यादीत नाव तपासणी सुरू केली, पण त्यांनी नंतर लक्षात आणून दिले की ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील घाटकोपर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत नाव सापडेल. यावेळी मात्र नाव तपासणे थांबवण्यात आले आणि घाटकोपर येथील मतदार यादीत नाव असल्याचा संबंधीत अधिकाऱ्यांचा दाखला आणण्यास त्यांना सांगण्यात आले.तत्पुर्वी अनामत रक्कम जमा करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी संबंधीत काऊंटरवर दोन पिशव्यातील नाणी मोजून अनामत रकमेची पावती त्यांनी यावेळी प्राप्त केली. या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली आणि त्यांनी ९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. त्यासाठी आशिर्वाद घेण्यासाठी त्यांनी मतदारांचा आशिर्वाद घेतला. सुमारे आठ दिवस मतदारांच्या भेटीगाठी करीत असताना त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी नाण्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत घेवून सुमारे २५ हजार रूपये प्राप्त केले. नाण्यांच्या स्वरूपातून मिळालेला पोखरकर यांनी मतदारांचा आशिर्वाद मिळवला आणि तीच नाणी अनामत रक्कम म्हणून त्यांनी जमा केल्याचे त्यांचे सक्रीय सहकारी व मराठा क्रांती मोर्चाचे प्रवक्ते संतोष सूर्यराव यांनी लोकमतला सांगितले. नाणी मोजण्यासाठी सुमारे दीड तास उशिर झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज आता मंगळवारी म्हणजे ९ एप्रिलरोजी स्विकारण्यात येणार असल्याचेही ही सूर्यराव यांनी सांगितले.

Web Title: 25 thousand rupees Chillhar for the deposit amount for the candidature of Thane Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.