पोलिओचा डोस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 10:24 AM2021-02-02T10:24:37+5:302021-02-02T10:25:40+5:30

भाळवणी येथील प्रकार : हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

While vaccinating the baby, a piece of plastic went into his stomach | पोलिओचा डोस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

पोलिओचा डोस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम रविवारी सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. अंगणवाड्यांमध्ये लसीकरण याची सोय केली होती.

पंढरपूर : पोलिओचा डोस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा तुकडा गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाळवणी (ता.पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रविवारी (३१ जानेवारी) पोलिओ लसीकरणादरम्यान हा प्रकार घडला. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम रविवारी सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. अंगणवाड्यांमध्ये लसीकरण याची सोय केली होती. रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देण्यासाठी भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. वैद्यकीय केंद्रातील एका महिला लांबूनच बाळाच्या तोंडात लस टाकत होती. बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसी बरोबरच ड्रॉप चे टोपण ( प्लॅस्टिकचा लहान तुकडा) ही बाळाच्या तोंडात गेले. हा प्रकार वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर माधुरी बुरांडे यांनी ही माहिती सामजिक कार्यकर्त्या राजश्री ताड यांना सांगितली.

ताड यांनी बाळाला घेऊन उपचारासाठी  दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित कर्मचारी पोलिओ पाजण्याचे काम करत होते अनावदानाने हा प्रकार घडला आहे. बाळ सुरक्षित आहे. त्याला कोणतीही इजा होणार नाही. 
- डॉ. एकनाथ बोधले
तालुका वैद्यकीय अधिकारी, पंढरपूर

Web Title: While vaccinating the baby, a piece of plastic went into his stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.