फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:42 PM2022-04-13T17:42:01+5:302022-04-13T17:42:07+5:30

द बर्निंग ट्रकचा थरार : वरवडेजवळ मध्यरात्री वाहतूक ठप्प

Lightning strikes truck carrying firecrackers; On the Solapur-Pune highway | फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक

फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक

googlenewsNext

टेंभुर्णी/मोडनिंब : पुणे-सोलापूर महामार्गावर वरवडे गावाजवळ पाऊस चालू असताना फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज पडून ट्रकला आग लागली. त्यामध्ये असणाऱ्या फटाक्यांनी आग पकडताच एक मोठा स्फोट झाला आणि बघता बघता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तब्बल दोन तास या ट्रकमधील फटाके उडत होते. त्यामुळे पुणे- सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा आला होता. ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ट्रक आग लागल्यानंतर चालक पळून गेला. अद्याप फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

टेंभुर्णी पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावर आकुंभे शिवारात मालट्रक पेटल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक, भरारी पथक, मोडनिंब वाहतूक पोलीस, टेंभुर्णी पोलीस स्टेशन तसेच वरवडे टोल नाका येथील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आणि दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल दोन तास बंद करून आगीचे तांडव कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. यामध्ये प्रामुख्याने वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथकाचे डॉ. महेंद्र ताकतोडे, समीर सोनार,गस्त पथकाचे प्रमुख अमर पाटील, विनोद भोसले, वरवडे टोल नाका येथील कर्मचारी वैभव गायकवाड, सुशील पाटील, हरिदास गवळी, शशी चौधरी, उल्हास काळे, संजय पांढरे, अपघात पथकाचे सहाय्यक फौजदार अभिमान गुटाळ, चालक पो.कॉ क्षीरसागर, महामार्ग पथकाचे पोसई मल्लिकार्जुन सोनार, पोहेकॉ हाके, पोहेकॉ नवले, पोकॉ गणेश शिंदे,पोकॉ सिद्धेश्वर कोडलिंगे गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले. सर्वांच्या परिश्रमाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये जीवितहानी झाली नाही, असे वरवडे टोल नाका येथील गस्त पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे. यात ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल उपलब्ध झाले नाही, अशी खंत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच टोल नाका येथील कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी गुटाळ हे करत आहेत.

 

Web Title: Lightning strikes truck carrying firecrackers; On the Solapur-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.