जयंत पाटील म्हणाले मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणूनच मी पंढरपुरात आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:55 PM2020-07-14T12:55:58+5:302020-07-14T13:20:13+5:30

पंढरपुरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद; सोलापूर जिल्ह्यातील जलसंधारण कामाचा घेतला आढावा

Jayant Patil said that I got the lift of the helicopter and that is why I came to Pandharpur | जयंत पाटील म्हणाले मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणूनच मी पंढरपुरात आलो

जयंत पाटील म्हणाले मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणूनच मी पंढरपुरात आलो

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून अक्षय कुमारला हेलिकॉप्टरने आल्याने विरोध केला होता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते

पंढरपूर : प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार हे नुकतेच नाशिक येथे हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली होती. असे असताना मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आपल्या दिलखुलास अंदाजमध्ये मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणून मी हेलिकॉप्टरने आलो असे उत्तर सांगत वेळ मारून नेली.

पंढरपूर येथे कार्यकर्त्याच्या भेटीला जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. यावेळी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते.

जलसंधारण विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उजनी धरण येथे (भीमानगर) जलसंपदा मंत्री जयंत पाटील बैठक घेणार होते, परंतु त्यांना हेलिकॉप्टर उतरण्यासाठी परवानगी न मिळाल्याने त्यांनी ती बैठक पंढरपूर येथे घेण्याचे निश्चित केले. ते थेट हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी आपल्या राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून अक्षय कुमारला हेलिकॉप्टरने आल्याने विरोध केला होता. तर आपण कसे हेलिकॉप्टरने आलात असा प्रश्न विचारला त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले हेलिकॉप्टर ची मला लिफ्ट मिळाली आहे. यामुळे मी हेलिकॉप्टर ने आलो असल्याचे हसत हसत जयंत पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Jayant Patil said that I got the lift of the helicopter and that is why I came to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.