पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:33 AM2017-10-30T11:33:28+5:302017-10-30T11:36:25+5:30

The alarm of 'Gyanoba-Tukaram' in Pandharpur 65 acres | पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर 

पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर 

Next
ठळक मुद्दे चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर परिसरात प्रशासनाच्या वतीने ३७३ प्लॉट तयार ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त


मोहन डावरे
पंढरपूर दि ३० : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून ६५ एकर क्षेत्रामध्ये दिंड्या विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारी आलेल्या दिंड्यांनी विसावा घेऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा गरज करीत ६५ एकराचा परिसर दुमदुमून सोडला़
कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर परिसरात प्रशासनाच्या वतीने ३७३ प्लॉट तयार करण्यात आले आहेत़ यामध्ये एकूण ३०० दिंड्यांमधील जवळपास १ लाख ३५ हजार ते दीड लाख वारकºयांच्या निवासाची सोय करण्यात आल्याची माहिती मोहोळचे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली़ 
वारीसाठी आलेल्या वारकºयांसाठी प्रशासनाच्या वतीने ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यामध्ये पाणी, वीज, तात्पुरती फायबरची स्वच्छतागृहे, प्रशस्त रस्ते आदी सुविधा देण्यात आल्या आहेत़ वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आपत्कालिन सुविधा केंद्रही सुरू केले आहे़ 

Web Title: The alarm of 'Gyanoba-Tukaram' in Pandharpur 65 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.