पुणे -पंढरपूर पालखी मार्गावर अपघात; २१ प्रवासी जखमी, टिपरचा चालक ठार

By Appasaheb.patil | Published: August 27, 2023 03:56 PM2023-08-27T15:56:13+5:302023-08-27T15:56:44+5:30

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर टिपर व एसटी बसचा अपघात झाला.

Accident on Pune Pandharpur high way route 21 passengers injured tipper driver killed | पुणे -पंढरपूर पालखी मार्गावर अपघात; २१ प्रवासी जखमी, टिपरचा चालक ठार

पुणे -पंढरपूर पालखी मार्गावर अपघात; २१ प्रवासी जखमी, टिपरचा चालक ठार

googlenewsNext

सोलापूर : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर टिपर व एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील २१ प्रवासी जखमी झाले असून टिपरचा चालक जागीच ठार झाला आहे. यात दोघांची परिस्थिती गंभीर आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पुणे -पंढरपूर पालखी मार्गावर पुणे - मंगळवेढा व पालखी मार्गाचे काम सुरू आहे. याच मार्गावर टिपर व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात मांडवे हद्दीत नातेपुतेपासून चार किलोमीटरवर झाला. या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवाय या अपघातात एसटी बसमधील २१ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताचे वृत्त समजताच माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख राजकूमार हिवरकर यांनी तात्काळ जखमीना ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यास मदत केली. तसेच आरोग्यमंञी तानाजी सावंत यांना फोनव्दारे कळविले.

Web Title: Accident on Pune Pandharpur high way route 21 passengers injured tipper driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.