वीज कंत्राटी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:01 PM2019-06-20T14:01:58+5:302019-06-20T14:02:56+5:30

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी काम बंद आंदोलन छेडण्यात आले. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी कंत्राटी कामगारांची जबाबदारी घेत वीज वितरण लेखी स्वरुपात आश्वासन देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.

Work Stop movement of electricity contract workers union | वीज कंत्राटी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन

वीज कंत्राटी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन

Next
ठळक मुद्देवीज कंत्राटी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट

कुडाळ : कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी काम बंद आंदोलन छेडण्यात आले. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी कंत्राटी कामगारांची जबाबदारी घेत वीज वितरण लेखी स्वरुपात आश्वासन देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी काम बंद आंदोलन छेडण्यात आले. यासंदर्भात अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यासंदर्भात विचारविनिमय केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंता रंजना पगारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

या अधिकाऱ्यांच्या समवेत वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अशोक सावंत यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अशोक सावंत यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. कंत्राटी कामगारांवर ठेकेदार असू दे किंवा कंपनीचे अधिकारी सातत्याने अन्याय करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या कामगारांचे पगार मिळालेले नाहीत. जीवावर बेतून ते काम करतात. नव्याने कामगारांशी करार अद्यापपर्यंत झालेले नाहीत. उद्या या कामावर असलेल्या कामगारांचे काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी
उपस्थित केला. मागील काही महिन्यांचे पगार जुन्या ठेकेदारांनी थकविले आहेत. यासंदर्भात काय कार्यवाही करणार, याचाही जाब त्यांनी विचारला.
यावेळी मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी सांगितले की, कामगारांचे थकीत पगार वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे राहिले आहेत की ठेकेदारामुळे, याची पडताळणी आम्हांला करावी लागेल. पण कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष आनंद लाड, संदीप बांदेकर, तालुका प्रतिनिधी सिद्धेश सावंत, संजय गोवेकर, मोहन गावडे, राजू दळवी, सर्वेश राऊळ, लोकेश सांगवेकर, महेश राऊळ आदी उपस्थित होते.
सिंधुफोटो ०३
कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र वीज वितरणच्या अधिकाºयांना अशोक सावंत यांनी जाब विचारला. यावेळी कंत्राटी कामगार उपस्थित होते.

Web Title: Work Stop movement of electricity contract workers union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.